vadgaon women andolan demands to arrest suspicious culprits  Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur : 'त्या' घटनेतील संशयित अद्याप माेकाट, वडगावातील उपाेषणकर्त्या महिलेची प्रकृती ढासळली

vadgaon women andolan demands to arrest suspicious culprits: पोलिसांनी तीन दिवस प्रयत्न करूनही उपोषणकर्त्या महिला मागणीवर ठाम राहिल्याने पोलिसांची पंचाईत झाली आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगांवकर

दोघा तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात सहभागी असणाऱ्या संशयितांना तातडीने अटक करावे या मागणीसाठी काेल्हापूर जिल्ह्यातील वडगाव नगरपालिका चौकात महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपाेषणाचा आज तिसरा दिवस आहे.

अवैद्य धंद्यातून 11 मे रोजी पोलिस ठाण्याजवळच अक्षय माने व प्रभाकर कुरणे यांच्या दोन गटात वाद झाला होता. या वादात अक्षय माने याच्यावर हत्याराने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

हा वाद मिटविण्यासाठी गेलेला कुरणे याचा मित्र रोहित पाटील व राहुल लोहार यांच्यावर अक्षय माने गटातील काहींनी मारहाण करत गंभीर दुखापत केली होती. मात्र याप्रकरणी पोलिसांनी एकतर्फी कारवाई करत फक्त कुरणे गटाच्या युवकांवर पोलिसांनी राजकीय दबावाखाली कारवाई केल्याचा लोहार व पाटील कुटूंबियांचा आरोप आहे.

अक्षय माने गटाच्या विरोधात फिर्याद देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. तातडीने यात सहभागी असणाऱ्या संशयित आरोपींना अटक करावी व फिर्यादीत असलेली कलमे लावावीत या मागणीसाठी शोभा बाळासो पाटील, मीना सुरेश लोहार, उमा नवनाथ हाके, शारदा जाधव या नगरपालिका चौकात उपोषणास बसल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT