कोकणात पावसाचा जोर वाढणार! सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट,जगबुडी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

jagbudi river water level increased : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
rain hits konkan jagbudi river water level increased
rain hits konkan jagbudi river water level increasedSaam Digital
Published On

- अमाेल कलये / विनायक वंजारे

गेल्या दाेन दिवासंपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जगबुडी नदीची पाणी पातळी 6.20 मीटरपर्यंत पाेहचली आहे. या नदीची धोका पातळी 7 मीटर आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर जगबुडी नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खेड तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. शेतात पाणी साचत असल्याने शेतीची कामे धिम्या गतीने सुरु आहे. पावसाचा जाेर वाढत असल्याने जगबुडी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ हाेत असल्याचे चित्र आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनूसार जगबुडी नदीची पाणी पातळी 6.20 मीटर पर्यंत पाेहचली आहे. या नदीची धोका पातळी 7 मीटर आहे. पावसाचा जोर कायम राहीला तर जगबुडी नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

rain hits konkan jagbudi river water level increased
Police Bharti 2024 : पोलिस भरती प्रक्रियेत मोठा बदल, अकोल्यात १००० उमेदवारांची शारीरिक चाचणी रद्द

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह इतरही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही भागात थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे अद्याप कुठेही पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या नाहीत.

Edited By : Siddharth Latkar

rain hits konkan jagbudi river water level increased
पर्यटकांनाे! आंबोली घाटात धबधबा पाहण्यासाठी जाणार आहात? वाचा नवा नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com