रत्नागिरीला मुसळधार पावसाचा फटका, परशुराम घाटात भिंत कोसळली; जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडली

rain hits ratnagiri jagbudi river water level increased : मुंबई गोवा महामार्गाचे काम परशुराम घाटातून होत असताना खुदाई केल्यानंतर रस्ता वाहून जाऊ नये यासाठी संरक्षक भिंत बांधली गेली होती.
rain hits ratnagiri jagbudi river water level increased know the traffic update of parshuram ghat
rain hits ratnagiri jagbudi river water level increased know the traffic update of parshuram ghatSaam Digital
Published On

रत्नागिरी जिल्ह्यात गेले दाेन दिवस पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यात जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. खेडसह चिपळूण परिसरात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. दूसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसऴल्याने धाेकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

रत्नागिरीसह खेड परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदीपात्रात कमालीची वाढ हाेऊ लागली आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी 5.25 मीटर इतकी वाढली आहे. काेकणातील या पट्ट्यातील पावसाचा पूर्वानुभव लक्षात घेता प्रशासनाने ठाेस पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. खेड, चिपळूण परिसरात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.

rain hits ratnagiri jagbudi river water level increased know the traffic update of parshuram ghat
पर्यटकांनाे! आंबोली घाटात धबधबा पाहण्यासाठी जाणार आहात? वाचा नवा नियम

भोईवाडीत घरावर संरक्षक भिंत कोसळली

खेड तालुक्यातील सोनगाव मधल्या भोईवाडीत घरावर संरक्षक भिंत कोसळून घराचे नुकसान झाले आहे. या भागात मुसळधार पाऊस सुरू असून जमीन खचून संरक्षक भिंत थेट पुष्पा पारधी यांच्या घरावर कोसळली. त्यामुळे पारधी यांच्या घराचे मोठं नुकसान झाले आहे. कोकणात गुरुवारपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागात जमीन खाचण्याचे प्रकार सुरू झाल्याचे चित्र आहे.

परशुराम घाट रस्ता धाेकादायक बनला

दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्याने मुख्य रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. संरक्षक भिंत कोसळल्याने मातीचे ढिगारेच्या ढिगारे गटारात वाहू लागले आहेत. सुमारे दीड किलोमीटर लांबीची ही संरक्षक भिंत हाेती.

Edited By : Siddharth Latkar

rain hits ratnagiri jagbudi river water level increased know the traffic update of parshuram ghat
MSP ची वाढ तुटपुंजी, केंद्र सरकराने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं : डाॅ. अजित नवले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com