Reels चा नाद पडेल भारी, करावी लागेल पाेलिस ठाण्याची वारी;कोल्हापुरात विशेष माेहिमेस प्रारंभ

kolhapur police appeals reels star to follow law : कोल्हापूर पोलिस दलाने गुन्हेगारांना शेवटची संधी देत असल्याचे यावेळी सांगितलं. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, संजीव झाडे, दिलीप पवार, रमेश तनपुरे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
kolhapur police appeals reels star to follow law
kolhapur police appeals reels star to follow lawSaam Tv

- रणजीत माजगांवकर

कोल्हापूर शहरातील गुन्हेगारी माेडीत काढण्यासाठी पोलिस ऍक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. पाेलिसांनी खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, अपहरण, शस्त्राचा धाक दाखवणे यासह विविध गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा पाेलिस ठाण्यात बाेलावून समज दिली. यावेळी कोल्हापूर पोलिसांनी गुन्हेगारांना केवळ समजच दिली नाही तर आपल्या स्टाईलनं डोस दिल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात हाेती.

कोल्हापूर शहर आणि परिसरातील मोक्का तसच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना राजारामपुरी पोलीस ठाण्यात एकत्र आणलं. या गुन्हेगारांचा शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी खरपूस समाचार घेतला.

kolhapur police appeals reels star to follow law
Amboli Waterfall: आंबाेली घाटात धबधब्यावर पर्यटकांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO बघा!

गुन्हेगारांची उठबस कुठे आहे. त्यांचे कुणा कुणाशी संबंध आहेत. सध्या ते कोणत्या व्यवसायात आहेत. यासंबंधी पोलिस कर्मचाऱ्यांनी दररोज माहिती घ्यावी आणि आपल्याला कळवावं. या गुन्हेगारांसंदर्भात किरकोळ तक्रार जरी प्राप्त झाली तरी त्यांची गय केली जाणार नाही अशी सूचना वजा इशाराच टिकेंनी दिला.

यासोबतच एकमेकांना सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून आव्हान देऊन टोळी युद्ध घडल्यास अशा रिल्स स्टारवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

kolhapur police appeals reels star to follow law
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com