Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

हिदामीच्या बाबत गोपनीय माहिती पोलिसांच्या गुप्तचर शाखेला मिळाली हाेती.
rajula hidami, gadchiroli, hsc result
rajula hidami, gadchiroli, hsc resultsaam tv

- शुभम देशमुख

Gondia News : एकेकाळी नक्षल चळवळीचा भाग असलेली १९ वर्षांची आदिवासी मुलगी आता हिंसाचाराने भरलेल्या त्या जीवनापासून काही मैल दूर झाली आहे. तिने नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत (HSC Exam Result 2023) उज्जवल यश मिळविले. या यशानंतर तिच्याशी साम टीव्हीने संवाद साधला असता तिने पोलीस दलात कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.(Maharashtra News)

rajula hidami, gadchiroli, hsc result
ICSE Board 10th Result 2023 : डोंबिवलीच्या रुद्र मुकादम देशात दुसरा, शिक्षकांनी सांगितलं यशाचे गमक

ही रंजक कथा आहे, गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यातील कुरखेडा (khurkheda) तालुक्यातील दुर्गम लव्हारी गावातील राजुला रवेलसिंग हिदामी (rajula hidami) या विद्यार्थींनीची.

राजुला हिला जबरदस्तीने पळवून नेऊन नक्षलांच्या छावणीत भरती करण्यात आले. तिथे तिला बंदुकीचे धडे देण्यात आले. कोरची- कुरखेडा- खोब्रामेंढा दलम यासह तिच्या दोन वर्षांच्या सहवासात बंडखोरांनी तिला शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले.

सुरक्षा दलांशी झालेल्या एका लढाईत तिचा सहभाग हाेता. शस्त्र सोडून पेन हाती घेण्याची भावना तिच्या मनात हाेती. याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांच्या गुप्तचर शाखेला मिळाली.

rajula hidami, gadchiroli, hsc result
Success Story : कडू कारल्याची गोड कहाणी; मावळातील शेतक-याने एक एकरातून कमाविले साडेतीन लाख

राजुलाने तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप आठोळे यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. आठोळे यांनी तिचे पालकत्व स्वीकारले. तत्कालीन आयटीडीपीओ प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांच्या मदतीने तिला आदिवासी निवासी शाळेत दाखल केले.

नक्षलवाद्यांमध्ये सामील होण्यापूर्वी राजुलाने इयत्ता 7 वी शिक्षण पूर्ण केले होते. 2018 मध्ये इयत्ता 8 वी मध्ये प्रवेश घ्यायचा होता. आठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन एसपी हरीश बैजल, एपीआय कमलेश बच्चव, पीएसआय चंद्रहास पाटील हेडकॉन्स्टेबल ओमप्रकाश जामनिक, चंद्रशेखर गणवीर आणि रमेश मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली राजुलाने २०२१ मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.

rajula hidami, gadchiroli, hsc result
Positive News : कांदा लसूण विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, दागिन्यांसह हजाराे रुपये केले परत

राजूला हिला पाेलीस व्हायचे आहे

तिने बारावीच्या परिक्षेत देखील उत्तम गुण मिळविले. ४५.८३ टक्के गुण प्राप्त केलेली राजुला साम टीव्हीशी बाेलताना म्हणाली मला पोलीस व्हायचे आहे. पाेलीस दलात भरती हाेऊन मी समाजाचे रक्षण करीन. गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे (gondia sp nikhil pingle) यांनी राजुला हिदामी हिचे काैतुक करुन तिला भावी आयुषयास शुभेच्छा दिल्या.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com