Success Story : कडू कारल्याची गोड कहाणी; मावळातील शेतक-याने एक एकरातून कमाविले साडेतीन लाख

पिंपरी मार्केटमध्ये नागरिक आवर्जुन कारलं विकत घेतात.
maval news, bitter melon
maval news, bitter melonsaam tv

Maval News : वडिलोपार्जित पाच एकर शेतीतून टोमॅटो, भात, पालक, कांदा, मिरची, अशी सेंद्रिय पद्धतीने पीक घेणा-या मावळ तालुक्यातील शेतक-याने मार्केटची गरज ओळखून कारल्याचे उत्पादन घेतले आणि त्यातून आर्थिक प्रगती साधली. (Maharashtra News)

maval news, bitter melon
Swabhimani लढविणार लाेकसभेच्या सहा जागा; 'या' मतदारसंघातून Raju Shetti लढणार

मावळ तालुका हा प्रामुख्याने भात शेतीसाठी म्हणून ओळखला जातो. पवन मावळातील थुगाव येथील सुनील पोटफोडे या शेतकऱ्याने पारंपारिक पद्धतीच्या शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून नगदी पीक घ्यायचे ठरवले. वातावरण तसेच मार्केटची गरज ओळखून कारल्याचे उत्पादन घ्याचे त्याने ठरविले. आपली वडिलोपार्जित पाच एकर शेती त्यांच्याकडे आहे. यात त्यांनी टोमॅटो, भात, पालक, कांदा, मिरची, अशी सेंद्रिय पद्धतीने पीक घेतात.

maval news, bitter melon
Pune Water Cut News : पुणेकरांनाे ! 'या' दिवशी तुमच्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या 'रोटेशन' पद्धत

शेताच्या चारही बाजूने विशिष्ट अंतरावर बांबूचा वापर करत तारा बांधून कारल्याचे वेल त्यावर सोडले. पोटफोडे यांनी तयार केलेल्या कारल्याची थेट पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) मधील शेतकरी कट्ट्यावर विक्री करीत असल्याने त्यांची दलाली पासून सुटका झाली. त्यांच्या सेंद्रिय पद्धतीने केलेल्या कारला पिकाची पिंपरी मार्केटमध्ये नागरिक आतुरतेने वाट बघत असतात.

maval news, bitter melon
Pune Bangalore Highway Traffic Update: पुणे-बंगळूर महामार्गावर पाेलिसांनी सदाभाऊंपुढे जाेडले हात, 'रयत' चालतच राहिली; वाहतूक मंदावली

दरम्यान घरातील सर्व सदस्य कारल पीक काढण्यास मदत केल्यामुळे मजुरीही वाचली. नांगरणी, सपाटीकरण, गादी वाफे, आणि खत यासाठी त्यांना 50 ते 55 हजार रुपये खर्च आला. तीन ते चार महिन्याच्या या कारल्याच्या पिकात त्यांना साडेतीन लाख रुपये उत्पादन मिळणार आहे. पन्नास हजार खर्च वजा करता निव्वळ तीन लाख रुपये त्यांना नफा होण्याची अपेक्षा आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com