- अभिजीत देशमुख
ICSE Results 2023 Declared : आयसीएसई बोर्डचा इयत्ता दहावीचा (icse board ssc result) ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला. या परिक्षेत डोंबिवली येथील रुद्र मुकादम (rudra mukadam) याने (99.60 टक्के) उज्जवल यश मिळविले आहे. त्याचा संपूर्ण देशात दुसरा क्रमांक आला आहे. (Maharashtra News)
आयसीएसई बोर्डचा इयत्ता दहावीच्या परिक्षेत 99.8 टक्के गुण मिळवून नऊ जणांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे. त्यापैकी पाच जण मंबईतील आहेत. दरम्यान डोंबिवली पूर्व परिसरातील राहणारा रूद्र मुकादम हा ओमकार इंटरनॅशल स्कूलचा विद्यार्थी. त्याने या परिक्षेत 99.60 टक्के गुण मिळवून उज्जवल यश मिळविले आहे.
रुद्र हा दिवसातून दोन तास न चुकता अभ्यास करायच. विशेष म्हणजे शाळेतील शिक्षकांनी आणि क्लासमध्ये केलेल्या मार्गदर्शन आणि त्यातून दिलेल्या लिखाणावर भर यामुळे त्याला हे यश संपादन करता आले.
या यशाबद्दल रुद्र म्हणाला आई-वडिलांचा आपल्या यशात तितकाच मोलाचा वाटा आहे. परीक्षा जवळ आल्यानंतर तब्बल दोन महिने मोबाईल फोन पासून मी दूर राहिलो. अभ्यासानंतर खेळ आणि मित्रांशी संवाद ठेवत असेही रुद्रने म्हटलं.
रुद्रच्या यशानं डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याच्या आई-वडिलांना देखील मुलाच्या यशाने आनंद झाला आहे. मेहनत करा यश तुम्हांला नक्कीच मिळेल असा आदर्श रुद्रने अन्य विद्यार्थ्यांंपुढे ठेवल्याचे त्याच्या शिक्षकांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.