420 च्या तक्रारीवरुन Gautami Patil म्हणाली, मी तर... (पाहा व्हिडिओ)

गाैतमी पाटील हिचे राज्यभर सध्या कार्यक्रम हाेत आहेत.
Gautami Patil, Sangli, Barshi
Gautami Patil, Sangli, Barshi Saam TV

Gautami Patil News : आपण वेळेतच कार्यक्रमाला पोहोचलो होतो. परंतु माझ्यावर जे काही आरोप करण्यात आले आहेत अथवा तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्याची सखोल माहिती घेऊन पुढील भाष्य करू अशी प्रतिक्रिया लावणी साम्राज्ञी गौतमी पाटील (gautami patil latest marathi news) हिने तिच्यावर बार्शीत दाखल झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीविषयी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

Gautami Patil, Sangli, Barshi
Narayan Rane News : जागेची अडचण? उद्योजकांसाठी नारायण राणेंची साता-यात माेठी घोषणा; उदयनराजेंनी केलं स्वागत

सोलापूर (solapur) जिल्ह्यातील बार्शी गावात गौतमी पाटील हिचा शो झाला होता. या शोसाठी परवानगी न घेतल्याने त्याच्या आयोजकांविरोधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आयोजकाने देखील गौतमी पाटील हिच्या विरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

Gautami Patil, Sangli, Barshi
Daddy आणि त्यांच्या Girlfriend च्या भानगडीचा आईला त्रास, मुलीची पाेलिसांत तक्रार

लावणी साम्राज्ञी गौतमी पाटील हिने बार्शीत केले गेलेल्या आरोपांचे खंडन केले. गाैतमी म्हणाली आपण वेळेतच कार्यक्रमाला पोहोचलो होतो. पण जे काही आरोप करण्यात आले आहेत, तक्रार दाखल करण्यात आली आहे त्याची सखोल माहिती घेऊन यावर पुढील भाष्य करू.

त्याचबरोबर अजून आपलं लग्न ठरलं नाही आणि लग्नाचा अजून कोणताही विचार नसल्याचे देखील गौतमी पाटील हिने स्पष्ट केले आहे. सांगलीच्या विटा नजीक कळंबी येथे कार्यक्रमासाठी गाैतमी आली हाेती. त्यावेळी तिने साम टीव्हीशी संवाद साधताना काही प्रश्नांना दिलखूलास उत्तरं दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com