Narayan Rane News : उद्याेग, व्यवसाय करणा-यांसाठी जागेची अडचण भासत आहे, त्यामुळे युवा पिढीसह उद्याेजक बनू इच्छिणा-यांची माेठी अडचण झाली आहे. त्यामुळेच सरकारने आता एक नवी अनाेखी याेजना आणण्याचा निर्धार केला आहे असे केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज (शुक्रवार) सातारा येथे जाहीर केले. ते म्हणाले खासगी जागेवर इंडस्ट्री पार्क उभरण्याचा एकत्र येऊन संकल्प करा त्यासाठी सरकार तुम्हांला परवानगी देईल तसेच कर्जही देईल असे राणेंनी जाहीर केले.
सातारा जिल्ह्यात उद्योगधंदे आणि रोजगारामध्ये वाढ व्हावी या हेतूने खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या संकल्पनेतून नक्षत्र फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी आणि छत्रपती उदयनराजे मित्रसमूह यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा (Satara) येथे एक दिवसीय उद्योग परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उदघाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी मंत्री राणे बाेलत हाेते.
प्रारंभी राणे यांनी उद्योजकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील (साताऱ्यासह पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर) काही निवडक यशस्वी उद्योजकांचा राणेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राणे यांनी युवकांनी पुरस्कारर्थी उद्याेजकांचा आदर्श डाेळ्यासमाेर ठेवून वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान उद्योग विश्वात कार्यरत असणाऱ्यांबरोबरच नव्याने कार्यरत होऊ इच्छिणाऱ्यांना मंत्री राणे यांनी मार्गदर्शन करताना काेकणासह आसाम, मुंबई तसेच देश-परदेशातील उद्याेग आणि काही उद्याेजकांचे अनुभव सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र हा प्रगत प्रदेश आहे असे मी समजत हाेताे. परंतु हा भाग समृद्ध नसल्याचे माझ्या लक्षात आलाे आहे. आर्थिकदृष्टी हा भाग समृद्ध हाेण्यासाठी दरडाेई उत्पन्न वाढीसाठी काेणते प्रयत्न करणे आवश्यक आहे याचा लाेकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे असेही राणेंंनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.