Satara Crime News : पुण्यात राहणा-या सहाय्यक दुय्यम निबंधकाने साता-यात घेतली लाच; ACB ने घेतलं ताब्यात

संबंधितांवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे एसीबीच्या अधिका-यांनी सांगितले.
Bribe, satara
Bribe, sataraSaam Tv
Published On

Satara News : सातारा जिल्ह्यातील सहाय्यक दुय्यम निबंधकास (वर्ग 2) एक हजार पाचेश रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने आज (बुधवार) रंगेहात पकडले. नोटीस ऑफ इंटीमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी तक्रादाराकडे लाचेची मागणी करण्यात आली हाेती. त्याबाबतची पडताळणी एसीबीने मंगळवारी (ता. 9 मे) केली आणि आज सापळा लावून सहाय्यक दुय्यम निबंधकावर (वर्ग 2) कारवाई केली. (Breaking Marathi News)

Bribe, satara
Rajaram Sahakari Sakhar Karkhana : 'राजाराम' च्या अध्यक्षपदी अमल महाडिक, उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण

तक्रारदाराकडून सातारा येथे सहाय्यक दुय्यम निबंधक (वर्ग 2) यास एक हजार पाचशे रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक उज्वल वैद्य, पोलीस नाईक प्रशांत नलावडे, पोलीस शिपाई तुषार भोसले या सापळा पथकाने पकडले. त्यानंतर त्याच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे एसीबीच्या अधिका-यांनी सांगितले.

Bribe, satara
NEET 2023: नीट परीक्षा काळात सांगलीत विद्यार्थिनींशी गैरवर्तन; अंतर्वस्त्र काढा, कपडे उलट घाला, पालकांची NTA कडे धाव (पाहा व्हिडिओ)

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनूसार सहाय्यक दुय्यम निबंधक (वर्ग 2) सातारा क्रमांक -1 कार्यालयात कार्यरत असणा-या उदय धनाजी सूर्यवंशी (वय 42, राहणार पुणे) याने नोटीस ऑफ इंटीमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी तक्रादाराकडे एक हजार पाचेश रुपयांची लाचेची मागणी केली. त्याची पडताळणी काल (ता. 9 मे) केली आणि आज संबंधितास लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com