Success Story : दाेनदा अपयश येऊनही आडळकर खचले नाही, हळदीतून एकरी अडीच लाखाचे मिळवले उत्पन्न; सेंद्रिय शेती प्रयोग केला यशस्वी

तालुक्यातील वालूर परिसरात छोटे मोठे शेतकरी हळदीचे पीक घेतात.
Hemant Adalkar, Parbhani, Turmeric, Farmers, Selu
Hemant Adalkar, Parbhani, Turmeric, Farmers, Selusaam tv

Parbhani News : शेतीत पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवीन प्रयोग करणाचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांना प्रयोगशिल शेतकऱ्यांचे वेळावेळी मार्गदरर्शन घेणे काळाची गरज बनले आहे. ‘एकमेका साह्य करून अवघे धरू सुपंथ’ याप्रमाणे शेतकऱ्यांनी धुऱ्या-बांधावरुन भांडण-तंटे न करता, शिवारफेरी मारायला हवी. जगात कृषिक्षेत्रात होणारे बदल लक्षात घेत आपल्या पिक पद्धतीत बदल केले पाहिजेत. तरच शेतकरी बदलत्या जगाला सामोरे जावू शकेल, असा विश्वास त्यांच्या निर्माण करणे आवश्यक झाले असून, शेतकऱ्यांनी प्रयोगशिल शेतकऱ्यांना, त्यांच्या प्रयोगांना आणि कृषिप्रदर्शनांना भेटी दिल्या पाहिजेत. आर्थिक उन्नती साधलेल्या अशाच एका प्रयोगशिल हेमंत आडळकर शेतकऱ्याची ही यशोगाथा…! (Maharashtra News)

Hemant Adalkar, Parbhani, Turmeric, Farmers, Selu
Sadabhau Khot News : लाडवलेल्या जावयांना आवरा ! सदाभाऊंचा सरकारला इशारा; RTO त खाेतांचा राैद्र अवतार

येथील राजकीय क्षेत्रात भरीव कार्य करीत शेती मध्ये सुद्धा लक्ष केंद्रीत करून माजी नगरध्यक्ष व साईबाबा नागरी बँकचे अध्यक्ष, शेतकरी हेमंत आडळकर यांनी यंदा सेद्रीय हळद पिकातून एकरी अडीच लाखाचे उत्पन्न घेण्यात यश आले आहे. यामुळे आगामी काळात सेलू परिसरात ही हळद लागवडी ला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

वाकी शिवरातील शेती मध्ये गेल्या तीन वर्षा पासून आडळकर हे हळद पीक घेत आहेत, मात्र मजूर व योग्य तंत्रज्ञान व मार्गदर्शनाच्या अभाव निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांना सलग दोन वर्ष अपयशला सामोरे जावे लागले. तरी जिद्द त्यांनी ठेवली.

Hemant Adalkar, Parbhani, Turmeric, Farmers, Selu
Save Tiger Campaign : वाघ संवर्धनासाठी व्यापक प्रयत्नांची गरज : बंडू धोतरे

उत्पन्न पेक्षा उत्पादनासाठी लागलेला अधिकचा खर्च सहन करावा लागला परंतु यंदाच्या हंगामात साडे सहा एकर मध्ये मोठ्या उमदीने त्यांनी सेलम जातीच्या हळदीच्या बेन्याची लागवड केली. लागवडी पूर्वी त्यांनी एकरी दहा ट्रॅक्टर ट्रॉली शेण खत वापर केला. सेद्रीय खत, कृषी विद्यापीठतुन जैविक खत, खनीज द्रव्य, या सोबत दही, गूळ, चुनपीठ, वडा खालची माती, रान लिबाचा पाला, पाच किलो सडका गूळ यांचे मिश्र खत तयार करून पाण्या वाटे दिले. ड्रीचीग द्वारे खनीज द्रव्य दिली यांचा परिणाम हळद चांगलीच पोषक बहरत गेली. काढणीला कच्छा एक गड्डा साडेसात किलो वजनात भरला हळद काढणीला अवजारे शेतकरी बैल नांगराच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरद्वारे एक-एक सरी/ गादीवाफ्यामधून नांगर फिरवतो.

Hemant Adalkar, Parbhani, Turmeric, Farmers, Selu
MPSC Success Story : झेडपीच्या शाळेत शिकलेल्या बीडच्या सीमा शेखने राेवला एमपीएससीत झेंडा; राज्यात महिलांत प्रथम

जमिनीमध्ये वाढलेली हळद उघडी पडते. नंतर महिला हळदीचा प्रत्येक गड्डा हाताने फोडून त्यातील माती काढून टाकते. हाताने नवीन आलेले हळदीचे कंद, लागवडीसाठी तयार होणारे कंद/बंडा व कोचा वेगळा करतात. हे सर्व काम महिला बोटांच्या सहाय्याने करतात. सततच्या घर्षणामुळे महिलांच्या बोटांची कातडी निघते. बोटे हुळहुळी होतात. काही महिला या कामासाठी लोकरी मोजे वापरतात. मात्र, हे मोजे एक दिवसात फाटतात.

या कामासाठी विद्यापीठाने विकसित केलेले हातमोजे वापरले असता महिलांचे हात सुरक्षित होते. प्रतिमहिला २०% काम जास्त होते. महिलांना जाणवणारा थकवाही लक्षणीयरीत्या कमी होतो. हळद वेगळी काढल्यानंतर ती कूकरमध्ये शिजवल्यानंतर वाळवली जाते. हळद वाळवण्यासाठी साडी किंवा शेडनेट वापरली जाते. हळद शिजवल्यामुळे खूप गरम असल्यामुळे पहिले २४ तास तसेच ढीग ठेवून नंतर पसरवतात.

Hemant Adalkar, Parbhani, Turmeric, Farmers, Selu
Buldana Urban News : ३. २६ कोटींचा अपहार, 'बुलडाणा अर्बन' च्या अधिका-याची पाेलिसांत धाव; व्यापा-यासह कर्मचा-यावर गुन्हा

शिजवलेली हळद थंड होण्यासाठी २-३ दिवस लागतात. हळद चांगली वाळावी म्हणून दररोज खाली-वर करावी लागते. हे काम महिला हातानेच करतात. हळद जसजशी टणक होत जाते, तशी ती हाताला टोचते. हाताचे कातडे निघून आग होते. या कामासाठी मजूर मिळणेदेखील कठीण आहे. हळद खाली-वर करण्यासाठी लाकडी दाताळे.

या दाताळ्याचा वापर करून हळद खाली-वर करणे अत्यंत सोपे जाते. कामाची गती प्रतिक्विंटल १० टक्क्यांनी वाढते. या कामासाठी मजूरदेखील कमी लागतात. एकरी 35 ते 40 क्विंटल प्रमाणे साधारण दोनशे क्विंटल तयार हळकुंड उत्पादन झाले आहे. त्यांना हया हळदी पासून एकरी अडीच लाखांचे उत्पन्न झाले आह़े. तालुक्यातील वालूर परिसरात छोटे मोठे शेतकरी हळदीचे पीक घेतात.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com