Buldana Urban News : ३. २६ कोटींचा अपहार, 'बुलडाणा अर्बन' च्या अधिका-याची पाेलिसांत धाव; व्यापा-यासह कर्मचा-यावर गुन्हा

वसुली अधिकारी यांनी पाेलिसांत दिली तक्रार
buldana urban cooperative credit society
buldana urban cooperative credit societysaam tv

Latur News : लातूर शहरातच नव्हे तर महाराष्ट्रभर नावलौकीक असलेल्या बुलडाणा अर्बन को ऑप. क्रेडीट सोसायटी शाखा बार्शी रोड लातूर (buldana urban cooperative credit society branch barshi road, latur) या संस्थेतील ३ कोटी २६ लाख रूपयांचा फसवणुकीने अपहार केल्या प्रकरणी सोसायटीतील एका कर्मचा-यावर आणि एका व्यापा-यावर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

buldana urban cooperative credit society
Stamp Paper घेण्यासाठीचा नियम बदलला, Pimpri च्या मुद्रांक केंद्रावर नागरिकांची गर्दी; जाणून घ्या नवा नियम

सोसायटीचे वसुली अधिकारी सुरेश मधुकर वाघ यांनी पाेलिसांत दिलेल्या तक्रारीत बार्शी रोड लातूर या भागात बुलडाणा अर्बन को. ऑपरेटीव्ह सोसायटीची शाखा आहे. या शाखेत ५ एप्रिल २०२१ ते १ नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये या सोसायटीतील कर्मचारी कल्याण शामराव कुलकर्णी (वय ३८) रा. केशवनगर लातूर व उमेश सिताराम राठी (प्रो. प्रा. पियुष ट्रेडर्स, लातूर) यांनी संगनमत करुन संस्थेची फसवणुक केल्याचे म्हटले आहे.

buldana urban cooperative credit society
Love Story ला झाला विराेध, डार्लिंगला आणलं गावात पळवून; दाेघांनी संपवलं आयुष्य

कुलकर्णी याने पियुष ट्रेडर्सच्या चालू ठेव व्यतीरिक्त सोसायटीच्या जमा रकमेतील ३ कोटी २६ लाख रूपयांचा धनादेश फसवणूक करून पियुष ट्रेडर्सच्या नावे काढला. पियुष ट्रेडर्सचे प्रो. प्रा. उमेश सिताराम राठी यांनी तो धनादेश स्वीकारला. कुलकर्णी व राठी यांनी कट करून सोसायटीची ३ कोटी २६ लाख रूपयांची फसवणूक केली आहे असे सोसायटीचे वसुली अधिकारी सुरेश मधुकर वाघ यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

buldana urban cooperative credit society
Corona चा धाेका वाढला, साता-यानंतर 'या' जिल्ह्यात बॅंक, शाळांसह महाविद्यालयांत मास्क वापर अनिवार्य

वाघ यांच्या फिर्यादीवरून लातूरच्या एमआयडीसी पोलिसांनी कल्याण शामराव कुलकर्णी व उमेश सिताराम राठी या दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com