Corona चा धाेका वाढला, साता-यानंतर 'या' जिल्ह्यात बॅंक, शाळांसह महाविद्यालयांत मास्क वापर अनिवार्य

नागरिकांनी वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
Sangli, Mask, Coronavirus, covid-19
Sangli, Mask, Coronavirus, covid-19saam tv
Published On

Sangli Covid-19 Update : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बँका, शाळा, महाविद्यालयात वावरताना अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांना मास्क वापरावा असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. याबराेबरच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी स्वत:हून मास्कचा वापर करावा असेही आदेशात म्हटले आहे. (Breaking Marathi News)

Sangli, Mask, Coronavirus, covid-19
'Narayan Rane भुंकण्याचा काम करताे, शिव्या घालण्याशिवाय बाकी काही काम नाही'

सांगली जिल्ह्यातील कारागृहात एका बंदीस काेविड-19 ची लागण झाली. त्यानंतर त्यास तात्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. संबंधित बंदीच्या संपर्कातील सर्वांची काेविड-19 ची तपासणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी काढलेल्या आदेशात सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर दैनंदिन करणे अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Sangli, Mask, Coronavirus, covid-19
Bengaluru-Mumbai Industrial Corridor Project : राजामाता कल्पनाराजेंसह उदयनराजेंची भागाचा विकास व्हावा हीच इच्छा, तातडीने निर्णय द्या; आंदाेलकांची मागणी

याबराेबरच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी (आठवडे बाजार, एस.टी. स्टॅण्ड परिसर, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे) इत्यादी ठिकाणी सामाजिक अंतर पाळावे असेही आदेशात म्हटले आहे. नागरिकांनी वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com