Stamp Paper घेण्यासाठीचा नियम बदलला, Pimpri च्या मुद्रांक केंद्रावर नागरिकांची गर्दी; जाणून घ्या नवा नियम

नव्या निर्णयाची अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे.
Pimpri Chinchwad, Stamp Paper
Pimpri Chinchwad, Stamp Papersaam tv
Published On

Pimpri Chinchwad News : राज्यात मुद्रांक (स्टॅम्प पेपर) घेण्यासाठी (Stamp Paper New Rules 2023) नियमांत बदल करण्यात आला आहे. स्टॅम्प पेपर घेताना काही वेळेला नागरिक हस्ते पद्धतीने घेत असे. नव्या नियमानूसार स्टॅम्प पेपर घेतानाची हस्ते बंद करण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग नागरिकांची अडचण झाल्याचे चित्र पिंपरी चिंचवड येथे असल्याचे दिसून आले. पिंपरीतील मोरवाडीतील मुद्रांक केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. (Breaking Marathi News)

Pimpri Chinchwad, Stamp Paper
Dombivli Manpada Police News : छोट्या व्यावसायिकांसह कार चालकांना लुटणारी टाेळी जेरबंद; ११ मोबाईल, लॅपटॉप, रिक्षा जप्त

अनेक कारणांसाठी नागरिकांना मुद्रांकचा (Stamp Paper) वापर करावा लागताे. यामध्ये प्रामुख्याने न्यायालयीन कामासाठी, जमीन खरेदी- विक्री, एग्रीमेंट, हमीपत्र, स्वयंघोषणापत्र, भाडेकरार, बँकांचे व्यवहार अशा अनेक कारणांसाठी स्टॅम्प पेपरचा वापर करावा लागतो.

तुम्ही देखील अनेक वेळा शंभर, दोनशे, पाचशे किंवा हजार रुपयांचा स्टॅम्प पेपरचा वापर केला असेल. अनेक वेळा स्टॅम्प पेपर स्वतः खरेदी केला असेल अथवा इतरांच्या हस्ते स्टॅम्प पेपर घेतला असेल.

Pimpri Chinchwad, Stamp Paper
Mumbai Goa Highway Accident News : भोस्ते घाटात तिहेरी अपघात, ट्रकसह चालकाने ठाेकली धूम; पुण्यातील कारचं माेठं नुकसान

या संदर्भात शासनाने नवीन नियम लागू केला आहे. नव्या नियमानुसार स्टॅम्प पेपर खरेदीसाठी हस्ते पद्धत बंद करण्यात आलेली आहे. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2023 पासून सुरु झालेली आहे.

नव्या नियमानूसार स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी पक्षकाराला स्टॅम्प पेपर विक्रेत्याकडे स्वतः हजर रहावे लागत आहे. स्वत:चे ओळखपत्र दाखवून स्टॅम्प पेपर विक्रेत्याकडील रजिस्टर वर स्वाक्षरी करून आपल्याला स्टॅम्प पेपर घ्यावा लागत आहे.

Pimpri Chinchwad, Stamp Paper
'Narayan Rane भुंकण्याचा काम करताे, शिव्या घालण्याशिवाय बाकी काही काम नाही'

इतरांच्या हस्ते स्टॅम्प पेपर देण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी इतरांच्या हस्ते स्टॅम्प पेपर मागवण्याचा आग्रह धरू नये असे मुद्रांक विक्रेते सांगत आहेत. त्यामुळे आता जर आपल्या पैकी कुणाला स्टॅम्प पेपर हवा असेल तर आपण इतर कुणाच्याही हस्ते मागवू शकणार नाही. आपल्याला स्वतः मुद्रांक विक्रेत्याकडे उपस्थित राहून स्टॅम्प पेपर खरेदी करावा लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com