Mumbai Goa Highway Accident News : भोस्ते घाटात तिहेरी अपघात, ट्रकसह चालकाने ठाेकली धूम; पुण्यातील कारचं माेठं नुकसान

या अपघातानंतर एक ट्रकचालकाने ट्रकसह पळ काढला.
ratnagiri, bhoste ghat accident news
ratnagiri, bhoste ghat accident newssaam tv

- जितेश कोळी

Mumbai Goa Highway Accident News : मुंबई गोवा महामार्गवरील भोस्ते घाटात (bhoste ghat) अपघातांचे सत्र अजूनही सुरूच आहे. आज (बुधवार) दुपारी चारच्या सुमारास भोस्ते घाटात तिहेरी अपघात (accident) झाला. यामध्ये दोन ट्रक व एका कारचे माेठं नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच पाेलिस घटनास्थळी पाेहचले आहेत. (Breaking Marathi News)

ratnagiri, bhoste ghat accident news
Nilesh Rane Criticizes Vaibhav Naik: उद्धव ठाकरे, वैभव नाईकचा विषय संपला : निलेश राणे

भोस्ते घाटातील तीव्र उतरावर असणाऱ्या अवघड वळणावर मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कारला पाठीमागून येणाऱ्या दोन ट्रकची एका बाजूने धडक बसली. या अपघातानंतर एका ट्रक चालकाने ट्रकसह घटनस्थळावरून पळ काढला.

ratnagiri, bhoste ghat accident news
Kolhapur Collector Office News : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की; जाणून घ्या प्रकरण

दूस-या ट्रकची वळणावरील भिंतीला जोरदार धडक बसल्याने ताे रस्त्याकडेलाच अडकला. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांचा पाेलिसांनी पंचनामा केला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

दरम्यान या अपघातात पुण्यातील कारचे व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तिहेरी अपघातामधील ट्रकचा पाेलिस शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com