Sadabhau Khot News : लाडवलेल्या जावयांना आवरा ! सदाभाऊंचा सरकारला इशारा; RTO त खाेतांचा राैद्र अवतार

राज्य सरकारने एकदाचा ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं ?
sadabhau khot, sangli
sadabhau khot, sanglisaam tv
Published On

Sangli News : सौद्यासाठी राहुरीहुन सांगलीकडे (sangli) हळद घेऊन येत असलेल्या शेतकऱ्याचे वाहन आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सकाळी अडवले. त्यानंतर आरटीओच्या (RTO) अधिकाऱ्यांनी गाडी ओव्हरलोड असल्याचे सांगत तसेच विमा संपल्याने शेतक-यास (Farmer) 30 हजार इतका दंड ठाेठावला. (Breaking Marathi News)

sadabhau khot, sangli
Bhagwan Kokare Maharaj Health Update : भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती खालवली, बेमुदत उपाेषणावर आजही ठाम

राहुरीचे शेतकरी शिवाजी यादव यांनी दंड झाल्यानंतर शेतक-यांचे नेते सदाभाऊ खोत यांच्या कानावर ही गाेष्ट घातली. पेठ नाका येथे ही गाडी अडवत दंड केल्यानंतर हळद असलेली गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी कुपवाड भागातील सावळी येथील आरटीओ कार्यालयामध्ये आणून उभी केली होती.

दंड भरा आणि हळदीची पोती असलेली गाडी घेऊन जावा असं शेतकऱ्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी थेट सावळीच्या आरटीओ कार्यालयात जात गाडीतील हळदीची पोती कार्यालयाच्या प्रागंणात ओतून हळदीचा लिलाव सुरू केला.

sadabhau khot, sangli
Kolhapur News : दरोडेखोरांचा तासभर धुमाकुळ : पत्नीसह मुलाला दोरखंडाने बांधले, माजी सरपंचांच्या घरावरील दराेड्याचा थरार; कोल्हापूरहून श्वान पथक रवाना

सदाभाऊ खोत यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आणि संताप व्यक्त केला. यावेळी राज्य सरकार आणि आरटीओ खात्याच्या कारभारावर सदाभाऊ खोत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

sadabhau khot, sangli
Nagar News : मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, रात्रीत घरं उभारली गेली (पाहा व्हिडिओ)

एकीकडे अवकाळीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्याला दुसरीकडे अशा पद्धतीने लुटले जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला. राज्य सरकारने एकदाचा ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं ? जनतेला लुटणा-या सरकारच्या लाडवलेल्या जावयांना सरकार आवरणार की नाही ? अधिकाऱ्यांचा माजुरपणा सरकारने थांबवावा असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com