
- रणजीत माजगावकर
Kolhapur News : कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील आजरा (ajara) तालुक्यातील रायवाडा (raiwada) येथील सशस्त्र दरोड्याच्या तपासासाठी पाेलिसांचे पथक अन्य राज्यात पाठविण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. खानापूरचे माजी सरपंच प्रल्हाद गुरव (khanapur former sarpanch prahald gurav) यांच्या घरावर पडलेल्या दराेड्याच्या तपासाच्या अनुषंगाने काेल्हापूरहून श्वान पथक रवाना झाले आहे. या घटनेतील संशयित हे कर्नाटक राज्यातील असण्याची दाट शक्यता पाेलिसांनी वर्तवली आहे. (Breaking Marathi News)
प्रल्हाद गुरव हे खानापूरचे माजी सरपंच आहेत. ते कुटुंबासहित शेतावर राहतात. येथे त्यांचे काजू प्रक्रिया युनिट, वराह पालन आहे. गुरव यांनी सांगितलेल्या माहितीनुसार कन्नड व मराठी भाषेत बोलणाऱ्या वीस पंचवीस लाेकांनी काजू प्रक्रिया युनिटसह घरात प्रवेश केला.
घरामधील स्वतः गुरव व त्यांच्या पत्नी पुनम गुरव (poonam gurav) व त्यांचा मुलगा राजेश गुरव (rajesh gurav) यांना मारहाण केली. त्यांचे दोरखंड आणि हातपाय बांधले. मालवाहतूक गाड्यातून दीडशे ते दोनशे डुकरे काजूचा माल, तिजोरीतील नऊ तोळे सोने व रोकड लंपास केली.
दरम्यान दरोडेखोरांचा सुमारे तासभर परिसरात धुमाकूळ सुरु हाेता. गावापासून गुरुव कुटुंब दूर शेतात राहत असल्यामुळे या प्रकाराची कल्पना कोणालाही लागली नाही. सध्या घटनास्थळी गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांचे पथक दाखल झाले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. तसेच कोल्हापूरहून श्वान (kolhapur police dog squad) पथक देखील मागवण्यात आले आहे. या घटनेतील जखमींच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.