Save Tiger Campaign : वाघ संवर्धनासाठी व्यापक प्रयत्नांची गरज : बंडू धोतरे

वाघांविरोधात नकारात्मक भावना निर्माण होत आहे.
tiger, chandrapur, tadoba tiger reserve,
tiger, chandrapur, tadoba tiger reserve,saam tv
Published On

Chandrapur News : देशातील व्याघ्र संवर्धनाचा परिणाम म्हणजे नुकतीच वाघांची जाहीर झालेली आकडेवारी. देशात वाघांची संख्या समाधानकारकरीत्या वाढली असताना चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात गेल्या वर्षभरात 50 हून अधिक ग्रामस्थांचे मृत्यू झाले आहेत. (Maharashtra News)

tiger, chandrapur, tadoba tiger reserve,
Buldana Urban News : ३. २६ कोटींचा अपहार, 'बुलडाणा अर्बन' च्या अधिका-याची पाेलिसांत धाव; व्यापा-यासह कर्मचा-यावर गुन्हा

एखाद्या व्याघ्र प्रकल्पापेक्षा अधिक वाघ ब्रह्मपुरी (brahmpuri tiger) तालुक्यातील प्रादेशिक जंगलात आढळले आहेत. याशिवाय गेल्या काही वर्षात कोळसा खाणी, औद्योगिक क्षेत्रे ,आयुध निर्माणी यासारख्या औद्योगिक आणि मुख्यत्वे शहरी भागातही वाघांचे नवे अधिवास निर्माण झाले आहेत. यातून गेली काही वर्षे वनव्याप्त क्षेत्रातील गावात कोरोनासारखा टायगर लॉकडाऊन बघायला मिळत आहे. यामुळे वाघांविरोधात नकारात्मक भावना निर्माण होत आहे.

tiger, chandrapur, tadoba tiger reserve,
Bus Concession For Woman: महिलांसाठी गाेड बातमी : एसटी पाठाेपाठ खासगी बसमध्येही 50 टक्के सवलत जाहीर, कुठे जाणून घ्या

ज्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात (tadoba tiger reserve) हजारो रुपये खर्च करून पर्यटक व्याघ्र सफारीसाठी येतात, त्याच वाघाचे ग्रामीण भागात लाठ्याकाठ्यांनी मारले जाते व प्रसंगी विषप्रयोगासारखी वागणूक दिली जाते. अशा स्थितीत वाघांची वाढती संख्या, त्यांच्यासाठीचे घटते जंगल, अतिक्रमित झालेले भ्रमण मार्ग याविषयी वनविभाग व प्रशासकीय पातळीवर व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचे मत बंडू धोतरे (वाघ अभ्यासक, चंद्रपूर) यांच्यासह तज्ञांनी नुकतेच मांडले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com