मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी काेल्हापुरात 16 हजार रिक्षा राहणार बंद (पाहा व्हिडिओ)

kolhapur auto rickshaw sanghatana call off strike on 25 june: रिक्षा संघटनेने पुकारलेल्या संपात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचाही सहभाग असणार आहे.
kolhapur auto rickshaw sanghatana call off strike over fine on late passing 25 june
kolhapur auto rickshaw sanghatana call off strike over fine on late passing 25 june Saam Digital

- रणजीत माजगांवकर

रिक्षा, टॅक्सी यांना पासिंग विलंब आकार प्रत्येक दिवशी 50 रुपये आकारला जात आहे. हा दंड त्वरित रद्द करावा या मागणीसाठी मंगळवारी (ता. 25) काेल्हापूर येथे रिक्षा व्यावसायिक संपावर जाणार आहेत. याबाबतची माहिती काेल्हापूर जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीच्या वतीने विजय देवणे यांनी माध्यमांना देण्यात आली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीचे नेते विजय देवणे म्हणाले या संपात 16 हजार रिक्षा सहभागी होणार आहेत. हा संप सोमवारी रात्री साडेअकरा ते मंगळवारी सायंकाळी पाच पर्यंत कोल्हापूर असा 16 तास असेल.

kolhapur auto rickshaw sanghatana call off strike over fine on late passing 25 june
Nagpur Goa Shaktipeeth Expressway: शेतक-यांना चौपट मोबदला द्या, अन्यथा भूसंपादन करू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

येत्या मंगळवारी (ता. 25 जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी रिक्षा व्यावसायिकांच्या प्रश्नात लक्ष घालावे यासाठी जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीने साेमवारी रिक्षा व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे असेही विजय देवणे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

kolhapur auto rickshaw sanghatana call off strike over fine on late passing 25 june
Jat Bandh : जत शहरात कडकडीत बंद, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उतरले रस्त्यावर; जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com