डाॅ. माधव सावरगावे / महेंद्र वानखेडे / सागर निकवाडे
महाराष्ट्रात आजपासून (बुधवार) पाेलिस भरतीस प्रारंभ झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे यंदा उच्चशिक्षित युवक भरतीसाठी उतरल्याचे चित्र मैदानावर आहे. यामध्ये एमबीए, अभियांत्रिकीसह एमसीए, एमकाॅम केलेल्या युवा वर्गाची लक्षणीय संख्या आहे. पाेलिस दलाकडून मिळालेल्या माहितीनूसार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस दलातील 147 जागांसाठी 339 उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
राज्यात उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असताना कोणती तरी नोकरी पदरात पडावी यासाठी जी भरती निघेल त्या ठिकाणी युवक येत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत असते. आजपासून सुरु झालेल्या पाेलिस भरतीत देखील असेच चित्र संभाजीनगर येथे पाहावयास मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस भरती प्रक्रियेत दहावी, बारावी झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज मागवण्यात आले हाेते. त्यात आता एमबीए, अभियांत्रिकी, एमसीए, एमकाॅम करणा-या युवकांनी देखील अर्ज दाखल केलेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी देखील चर्चेत आली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 754 जागा
ग्रामीण पोलिस दल 147 जागा
अभियांत्रिकी विद्यार्थी 16 अर्ज
डी फार्मसी 08
एमबीए 05
एमसीए 02
एमकॉम 09
बीसीए, बीबीए 05
एम ए एम एस सी 24
पदवीधर 270
नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था
नंदुरबार जिल्ह्यात पाेलिस भरतीस प्रारंभ झाला आहे. हा जिल्हा दुर्गम भागात वसलेला असून लांब पल्याने आलेले विद्यार्थी देखील या चाचणीला आलेत. पोलीस दलातर्फे विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मीरा भाईंदर : उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी वॉटरप्रूफ टेंट
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तल्याच्या हद्दीत आज पासून 234 पदांच्या पोलिस भरतीच्या शारीरिक चाचणीला सुरवात झाली आहे. याकरता नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाची निवड करण्यात आली आहे. पोलिस व पालिके मार्फत विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. पावसाळयाचे दिवस लक्षात घेता या ठिकाणी वाॅटरप्रुफ टेंट टाकण्यात आला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.