vinod shendge travelled 500 km on bicycle to spread importance of reading  Saam Digital
महाराष्ट्र

Nandurbar: वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी शिक्षकाचा 500 किलोमीटर सायकल प्रवास

Parbhani to Nandurbar Bicycle : विनाेद शेंडगे यांच्या प्रवास पुर्णत्वानंतर नंदुरबारच्या ग्रंथालय प्रेमींकडून त्यांच्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले हाेते. वाचन संस्कृती समाजात रुजविण्यासाठी या अवलियाची धडपड निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवण्यासाठी पाच कलमी सुत्री तयार करण्यात आली आहे. त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी परभणीच्या विनोद शेंडगे यांनी परभणी ते नंदुरबार असा 500 किलाेमीटरचा सायकल प्रवास नुकताच केला आहे.

परभणी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणा-या विनोद शेंडगे यांनी वाचन संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी त्यांनी वाचन पंचसुत्री तयार केली आहे. सहकुटंब वाचन करुया, वाचनासाठी निमित्त शोधूया, बालकांसाठी पुस्तक वाचन स्पर्धा ,वाचन संस्कार केंद्र आणि मी वाचलेले पुस्तक यांच्या माध्यमातून ते वाचन चळवळ रुजविण्याचे काम करत आहेत.

विनाेद यांनी 3 जुनला सकाळी सात वाजता परभणीहून नंदुरबारच्या दिशेने आपला सायकल प्रवास सुरु केला. रोज नव्वद ते शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि या प्रवासा दरम्यान येणा-या पाच ते सहा गावांना भेटी हा त्यांचा प्रवासातील नित्याचा उपक्रम.

या प्रवासा दरम्यान विनोद शेंडगे यांनी गावातील, शहरातील ग्रंथालय, शिक्षक, पत्रकार, साहित्य, वाचनप्रेमींना भेटी दिल्या. त्यांच्या उपक्रमााची माहिती दिली. वाचन चळवळ वाढविण्यासाठी काेणते प्रयत्न करावेत याबाबत चर्चा केली.

या प्रवासादरम्यान ते बोरी, चांदज, जिंतूर, देवगाव, मंठा, तळणी, लोहार, मेहकर,हिवरा आश्रम, चिखली, बुलढाणा, मोताळा, मलकापुर,मुक्ताईनगर, वरणगाव, भुसावळ,जळगाव, धरणगाव, अंमळनेर ,धुळे, सोनगीर, चिमठाणा, दोंडाईचा, नंदुरबार सारख्या शहरातून गावामध्ये त्यांनी वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी परिश्रम घेतले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Puranpoli: शेंगदाणा पुरणपोळी कशी बनवायची? स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी जाणून घ्या

Maharashtra Live News Update: सोलापुरात धनंजय मुंडे यांच्या समर्थनात आंदोलन

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' तारखेपासून लागू होणार आठवा वेतन आयोग; समोर आली मोठी अपडेट

Mansi Naik : मानसी नाईकबद्दल या ५ गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

Mobile Recharge: कमी बजेट? तरीही मिळणार 5G इंटरनेट, Vi चा 'हा' प्लॅन तुमच्यासाठी आहे परफेक्ट

SCROLL FOR NEXT