Parbhani: वडिलांच्या डोळ्यासमोर अंगावर वीज पडून बालकाचा मृत्यू,परभणीत दाेन बळी

lightning strike two passed away in parbhani : जूनच्या पहिल्याच मोठा दमदार पावसाने परभणी जिल्ह्यात दोघांचा बळी घेतला. नागरिकांनी मुसळधार पाऊस पडत असल्यास झाडाखाली थांबू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
lightning strike two passed away in parbhani
lightning strike two passed away in parbhani Saam Digital

परभणी जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका 13 वर्षाचा बालकाचा समावेश आहे. ताे धारासूर येथील रहिवासी आहे. अन्य घटनेत येलदरी येथील शेतमजुराचा मृत्यू झाला आहे.

गंगाखेड तालुक्यातील धारासुर येथे 13 वर्षाचा अक्षय वसंत राठोड हा आई वडिलांसोबत शेतात गेला होता. कापूस लागवड करीत असताना कापसाचे बियाणे कमी पडल्याने अक्षय वडिलांकडे धावत जात होता. त्याच दरम्यान त्याच्या अंगावर वीज पडली. त्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला.

lightning strike two passed away in parbhani
Gondia Accident : गोंदिया- कोहमारा मार्गावर बसला अपघात, 12 प्रवासी जखमी, 2 गंभीर

येलदरी जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरात सोमवारी सायंकाळच्या वेळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. शेळ्या चरण्यासाठी गेलेले धोंडीबा रामभाऊ वाकळे (वय 65) यांचा अंगावर वीज पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

lightning strike two passed away in parbhani
Sambhajinagar: शेतकऱ्यांनो सावधान, जाहिरातींना भुलू नका; संभाजीनगरात बाेगस बियाणे विक्रेत्यांवर कृषीची नजर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com