Rain Hits Latur: पावसाचा धुमाकूळ, लातूरचे जनजीवन विस्कळीत;शिरूर अनंतपाळ- उदगीर, लातूर- उदगीर मार्गावरील वाहतुक ठप्प

Rain Hits Latur : लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंतपाळ तालुक्यातील घरणी नदीवरील पर्यायी मुसळधार पावसाने पूल वाहून गेला आहे. त्यामुळे शिरूर अनंतपाळ - उदगीर हा राज्यमहामार्गही वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.
bridges collapsed in many places rain hits latur
bridges collapsed in many places rain hits latur Saam Digital
Published On

- संदीप भाेसले

लातूरमध्ये पावसाची जाेरदार बॅटींग झाल्याने लातूर - उदगीर महामार्गावरील नळेगाव येथील पुलाशेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला. परिणामी उदगीर लातूर महामार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद झाली आहे.

लातूरमध्ये पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. लातूर-उदगीर महामार्गावरच्या नळेगाव येथील नविन पुलाशेजारील पर्यायी रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे लातूर उदगीर वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांची फार माेठी अडचण झाली आहे.

bridges collapsed in many places rain hits latur
नागपूर : 13 गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

लातूर बार्शी महामार्गावरच भरला आठवडी बाजार

लातूर जिल्ह्यातल्या मुरुड गावात आज आठवडी बाजार आहे. मात्र आठवडी बाजाराच्या मोकळ्या जागेत पावसाचे पाणी साचल्याने आठवडी बाजार लातूर बार्शी महामार्गावरच भरवला आहे. त्यामुळे महामार्गावर प्रचंड मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या स्कूल बस देखील अडकून पडल्या. त्यामुळे नाहक विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास होतो आहे.

Edited By : Siddharth Latkar

bridges collapsed in many places rain hits latur
Rasta Roko Andolan : रायगड विभागातील 25 गावे, आणि वाड्यांचा संपर्क तुटेल? गांधारी पूलाच्या कामासाठी ग्रामस्थांचा रास्ता राेकाे, लवकरच प्रांत कार्यालयात बैठक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com