नागपूर : 13 गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

nagpur police booked 13 officers in anganwadi upgradation scheme : अंगणवाडी श्रेणीवर्धन योजनेअंतर्गत एक कोटी सहा लाख रुपयांचा साहित्याचा पुरवठा करण्यासाठी निधी प्राप्त झाला होता. तो निधी तालुका देण्यात आला होता.
nagpur police booked 13 officers in anganwadi upgradation scheme
nagpur police booked 13 officers in anganwadi upgradation schemeSaam Digital

- पराग ढाेबळे

नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत 49 अंगणवाड्याचे श्रेणीवर्धन घोटाळ्याची चौकशी लेखा अधिकारी यांच्या तीन सदस्य समितीतून करण्यात आली. या चौकशी अहवालाच्या आधारावर नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे रीतसर तक्रार देण्यात आली होती. त्यानूसार पाेलिसांनी नागपूर जिल्ह्यातील 13 पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तालुका स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अंगणवाडी श्रेणीवर्धन योजनेअंतर्गत एक कोटी सहा लाख रुपयांचा साहित्याचा पुरवठा करण्यासाठी निधी प्राप्त झाला होता, तो निधी तालुका देण्यात आला होता. यामध्ये 49 अंगणवाड्यांना श्रेणीवर्धन करण्यासाठी साहित्य पुरवायचे होते.

nagpur police booked 13 officers in anganwadi upgradation scheme
Pimpri Chinchwad Fire News : काळेवाडीत 2 कारखान्यांना भीषण आग, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरला

साहित्य पुरवण्यापूर्वी कंत्राटदाराने बिलाची रक्कम उचलली. त्यामुळे घोटाळा झाल्याच्या तक्रारी नंतर चौकशी समिती नेमण्यात आली. या 13 गटविकास अधिकारी आणि प्रकल्प अधिकाऱ्यांसह श्री बुक डेपो जनरल स्टोअर यवतमाळ, शांभावी एज्युकेशन नागपूर, रुषालीएम्पोरियम नागपूर यांच्या विरोधातही फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

nagpur police booked 13 officers in anganwadi upgradation scheme
Latur Water Crisis: पाण्यासाठी अख्ख गाव काढतय रात्र जागून, लातूर जिल्ह्यात भीषण स्थिती, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com