Pimpri Chinchwad Fire News : काळेवाडीत 2 कारखान्यांना भीषण आग, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरला

fire breaks out at factories in kalewadi: ज्या कारखान्याला आग लागली आहे. तो कारखाना अधिकृत कारखाना आहे का ? किंवा त्या कारखान्याला पिंपरी चिंचवड महापालिकेने परवानगी दिली होती का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
fire breaks out at factories in kalewadi near pimpri chinchwad
fire breaks out at factories in kalewadi near pimpri chinchwadSaam Digital

पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली आहे. आज (साेमवार) सकाळी 10 वाजता काळेवाडी येथील कपड्याच्या कारखान्याला आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती कळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल काही वेळातच घटनास्थळी पाेहचला.

ज्या ठिकाणी आग लागली त्या गोडाऊनमध्ये गॅस सिलिंडरचे स्फोट देखील होत हाेते. आगीचे धूर आकाशात सर्वत्र पसरले हाेते. या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची चर्चा हाेती.

fire breaks out at factories in kalewadi near pimpri chinchwad
Dombivli Crime : डोंबिवली हादरली! प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या, गावाजवळ मृतदेह सापडल्यानं खळबळ

पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत दाेन्ही कारखानामधील साहित्य जळून खाक झाले. परिणामी खूप माेठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

fire breaks out at factories in kalewadi near pimpri chinchwad
Rise In Vegetables Price: काय सांगता! 3 महिने भाजीपाल्याचे दर चढेच राहणार? जाणून घ्या मुंबईसह पुण्यातील दर (Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com