Dombivli Crime : डोंबिवली हादरली! प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या, गावाजवळ मृतदेह सापडल्यानं खळबळ

real estate agent sanjay bhoir passed away : भोईर यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा कोणासोबत वाद नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे संजय भोईर यांची हत्या कोणी आणि का केली याचा तपास सुरू आहे .
real estate agent sanjay bhoir passed away near dombivli police investigation begins
real estate agent sanjay bhoir passed away near dombivli police investigation beginsSaam Digtal

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

जमिनीच्या व्यवहारात ब्रोकरचे काम करणाऱ्या एका प्रॉपर्टी ब्रोकरचा मृतदेह डोंबिवलीजवळील उंबर्ली गाव परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .संजय भोईर असे या प्रॉपर्टी ब्रोकरचे नाव असून त्याची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालंय .भोईर यांची हत्या का व कुणी केली याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

डोंबिवली जवळील उंबार्ली गावात संजय भोईर कुटुंबासह राहतात. संजय भोईर जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात ब्रोकरचे काम करीत होते. शुक्रवारी रात्री भोईर यांचा मृतदेह उंबरली गावाजवळ असलेल्या मामाश्री ढाब्याच्या पाठीमागच्या रस्त्यावर आढळून आला.

real estate agent sanjay bhoir passed away near dombivli police investigation begins
Prithviraj Chavan On Porsche Car Case: महाराष्ट्रात श्रीमंतांसाठी वेगळा कायदा; पाेर्शे अपघात प्रकरणावरुन पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर राेख

या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. भोईर यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री संजय भोईर आपलं काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना त्यांचावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. मानपाडा पोलिसांनी संजय भोईर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Edited By : Siddharth Latkar

real estate agent sanjay bhoir passed away near dombivli police investigation begins
Agarwal Family's MPG Club Sealed: विशाल अग्रवालला सातारा जिल्हा प्रशासनाचा दणका, जाणून घ्या प्रकरण (Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com