उष्माघाताने शेकडाे कोंबड्यांचा मृत्यू, अमरावती जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक गर्तेत

Heatstroke to hundred chickens in amravati: पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय निकम यांच्याशी साम टीव्हीने संवाद साधला असता कोंबड्यांची शेड हे टिनाचे आहेत. वाढत्या तापमानामुळे कोंबड्याचा मृत्यू झाल्याचे नमूद केले.
heatstroke to hundred chickens in amravati poultry traders lakhs of rupees loss
heatstroke to hundred chickens in amravati poultry traders lakhs of rupees loss Saam Tv
Published On

- अमर घटारे

सध्या विदर्भात उष्णतेचा कहर सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील तापमान 44 अंश पेक्षा अधिक पोहोचले आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिकांसह जनावरांचे आराेग्य देखील बिघडल्याचे चित्र दिसून येत आहे. उष्माघातामुळे अमरावती जिल्ह्यातील शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहे. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांसह शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. तरी पशुपक्षांनाही जीवन जगणे कठीण झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा पारा सतत वाढत आहे.

heatstroke to hundred chickens in amravati poultry traders lakhs of rupees loss
Sambhajinagar Accident News: कुंभेफळ चौकात बस- ट्रक्टरचा भीषण अपघात, 1 ठार 16 जखमी (Video)

पाळा शेत शिवारातील कुक्कुट पालक व्यवसायिक रुपेश धनराज राणे यांच्या मालकीच्या 4 हजार कोंबडया उष्माघाताने मरण पावल्या. त्याचप्रमाणे मोहन गुणवंत ठोके यांच्या कुटकूट पालन शेड मधील दोन हजार कोंबड्या उष्माघाताने मरण पावल्या असल्याचे खात्रीशिर माहिती आहे. व्यवसायिकाची सुमारे 7 ते 8 लाख रुपयांची नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

heatstroke to hundred chickens in amravati poultry traders lakhs of rupees loss
Success Story: किन्हाळा तांड्यात दिवाळी साजरी, दिव्यांग लक्ष्मी राठोडची एमपीएससीत बाजी; ग्रामस्थांनी वाजतगाजत काढली मिरवणूक

व्यवसायिकाच्या शेतात शेड थंड करण्यासाठी शेड मध्ये कुलरची व्यवस्था करण्यात करण्यात आली असली तरी भारनियमन असल्यामुळे सतत वीज पुरवठा खंडित राहते त्यामुळेच या निष्पाप कोंबड्यांना आपला जीव गमावा लागला आहे. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय निकम यांनी देखील दुजाेरा दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

heatstroke to hundred chickens in amravati poultry traders lakhs of rupees loss
Satara Lok Sabha Constituency: साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदेंमध्ये काटे की टक्कर, कोणाला यश मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com