Sambhajinagar Accident News: कुंभेफळ चौकात बस- ट्रक्टरचा भीषण अपघात, 1 ठार 16 जखमी (Video)

bus tractor accident near chhatrapati sambhajinagar : पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अपघात घडल्याने अंधारात अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी घटनास्थळी काेणी नव्हते. काही वेळाने रुग्णवाहिका आली.
one passed away 16 injured in bus tractor accident near sambhajinagar
one passed away 16 injured in bus tractor accident near sambhajinagarSaam Tv

- डाॅ. माधव सावरगावे / संजय जाधव

छत्रपती संभाजीनगरात आज (साेमवार) पहाटेच्या सुमारास बसचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 16 जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातामधील सर्व जखमींना घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी : जालना मार्गावर कुंभेफळ चौकात बसने मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अपघात घडल्याने अंधारात अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी घटनास्थळी काेणी नव्हते. काही वेळाने रुग्णवाहिका आली. त्यानंतर जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान या भीषण अपघातात 1 जण ठार तर 16 जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

one passed away 16 injured in bus tractor accident near sambhajinagar
Rise In Vegetables Price: काय सांगता! 3 महिने भाजीपाल्याचे दर चढेच राहणार? जाणून घ्या मुंबईसह पुण्यातील दर (Video)

पळशी खुर्द फाट्याजवळ अपघात, दाेघांची प्रकृती चिंताजनक

बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द फाट्याजवळील वळणावर विटा घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समाेर आली. मालवाहू चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

one passed away 16 injured in bus tractor accident near sambhajinagar
कल्याणमधील नालेसफाईवर आमदार भाेईर नाराज, KDMC अधिका-यांना 5 दिवसांचा अल्टीमेटम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com