Gadchiroli Bus Accident :२७ प्रवाशांना घेऊन निघालेली एसटी बस उलटली, अपघाताचं नेमकं कारण आलं समोर

यामुळे प्रवाशांमध्ये घबराहाट पसरली. काहींनी भीतीने आरडा आेरडा केला. या अपघातानंतर रुग्णवाहिकेला बाेलावण्यात आले. त्यानंतर जखमीना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
msrtc bus accident at dhanur near gadchiroli
msrtc bus accident at dhanur near gadchiroli Saam Digital

- मंगेश भांडेकर

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून अमरावतीला निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा धनुर जवळ अपघात झाला. या अपघातात वाहकासह दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस रस्त्याच्या कडेला उलटल्याने अपघात झाल्याचे कारण समाेर आले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या अपघाता बाबतची प्राथमिक माहिती अशी - अहेरी आगाराची बस जवळपास 27 प्रवाशांना घेऊन सकाळी 8.30 वजता अमरावती करीता निघाली होती. अहेरी वरून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील धनुर जवळच्या वन विभागाच्या नाक्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याच्या बाजूला खोल भाग असल्याने बस पलटली.

msrtc bus accident at dhanur near gadchiroli
Amravati Hit And Run Case: पुण्यानंतर अमरावतीतही हिट अँड रन, घटना सीसीटीव्हीत कैद; युवक पाेलिसांना का सापडेनात? नातेवाईकांचा सवाल

यामुळे प्रवाशांमध्ये घबराहाट पसरली. काहींनी भीतीने आरडा आेरडा केला. या अपघातानंतर रुग्णवाहिकेला बाेलावण्यात आले. त्यानंतर जखमीना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

msrtc bus accident at dhanur near gadchiroli
Success Story: दिव्यांग 'माला' एमपीएससीत चमकली, शंकरबाबांच्या लेकीवर काैतुकाचा वर्षाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com