काेरेगाव : लाख माेलाचा जीव मुठीत धरून प्रवासी ओलांडतात रेल्वे रुळ, प्रशासन गांधारीच्या भूमिकेत

पैदल पूल लवकरात लवकर उभारण्यात यावा आणि तोपर्यंत मुंबईला जाणारी गाडी देखील पूर्वीप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथेच उभी करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
passengers crosses railway line carelessly in koregaon
passengers crosses railway line carelessly in koregaonSaam Digital

Satara :

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार चालल्याचं पहायला मिळतं आहे. कोरेगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे पैदल पूलाची सोय नसल्यानं लोकांना आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावा लागत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे-कोल्हापूर मार्गिकेच्या दुसऱ्या रेल्वे लाईनचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाल्यानं कोरेगाव रेल्वे स्टेशनवर आता दोन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मुंबईकडून कोल्हापूरला जाणारी गाडी आता प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर उभी राहते. (Maharashtra News)

कोल्हापूरकडून मुंबईला जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर उभी राहते. मात्र प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक दोन येथे जाण्यासाठी पैदल पूल नसल्याने आपला जीव धोक्यात घालून रूळ ओलांडावा लागतो.

passengers crosses railway line carelessly in koregaon
Vanchit Bahujan Aghadi: नगर 'वंचित'मध्ये उभी फूट? उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दाेन्ही गट आमने-सामने; मावळात जाेशींचा अर्ज दाखल

यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना मोठी कसरत करावी लागत आहे. आता पैदल पूल लवकरात लवकर उभारण्यात यावा आणि तोपर्यंत मुंबईला जाणारी गाडी देखील पूर्वीप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथेच उभी करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

passengers crosses railway line carelessly in koregaon
Wardha Election 2024 News: वर्धा लोकसभेसाठी 24 उमेदवार रिंगणात, उद्या 1997 केंद्रावर मतदान 6049 कर्मचारी तैनात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com