swabhimani shetkari sanghatana to take kaifiyat yatra from kagal to kolhapur on 26 June declares raju shetti Saam Digital
महाराष्ट्र

Raju Shetti News : सरकारने शेतक-यांना दिलेल्या शब्द पाळला नाही, 'स्वाभिमानी'ची आता कागल ते काेल्हापूर कैफियत यात्रा : राजू शेट्टी

swabhimani shetkari sanghatana kaifiyat yatra on 26 June : आता आमचा कुणावरही विश्वास नाही. राजर्षी राजा शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर जाऊन आम्ही आमची कैफियत मांडणार आहोत असे राजू शेट्टींनी स्पष्ट केले.

Siddharth Latkar

सरकारने शेतक-यांना दिलेल्या शब्द पाळलेला नाही. सध्या जाहीर केलेला हमीभाव ही केवळ ॲडजस्टमेंट आहे. सबसिडी देऊन भाव नियंत्रित करत असल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्याव्यात यासाठी येत्या 26 जूूनला कागल ते काेल्हापूर अशी कैफियत यात्रा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज (शुक्रवार) काेल्हापूर येथे माध्यमांशी बाेलताना दिली.

राजू शेट्टी म्हणाले मागील वर्षी तुटलेल्या ऊसाचा एफआरपी अधिक 100 रुपये मिळावेत अशी आमची मागणी होती. त्यासाठी संघटनेसमवेत शेतक-यांनी महामार्ग रोखला. ज्या कारखान्याने तीन हजार रुपये दिले त्यांनी जादा पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यायचे अशी मागणी ठरली हाेती. त्यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

स्वाभिमानीच्या आंदोलन काळात पोलिसांनी कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले. कार्यकर्त्यांवर अन्याय केला पण सरकारने दिलेले शब्द पाळलेला नाही अशी खंत राजू शेट्टींनी व्यक्त केली.

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा शतकोत्तर जयंती कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या जयंतीनिमित्त ऊस बाधित शेतकरी आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची कैफियत मांडणार आहोत. त्यासाठी कागल ते काेल्हापूर ( छत्रपती शाहू महाराज स्मृती स्थळ) अशी 26 जूनला पदयात्रा काढणार आहाेत.

सदाभाऊ खोतांना टाेला

दरम्यन राजू शेट्टी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सदाभाऊ खाेत यांचा नामाेल्लेख टाळत ज्यांचा चळवळशी संबंध नाही त्यांनी चळवळीवर बोलू नये असा टाेला हाणला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT