सांगली जिल्हा बँकेवर प्रशासक? फडणवीसांशी चर्चा, पडळकरांनी स्पष्टच सांगितलं; 25 जूनला चाबूक माेर्चा

Sangli Dcc Bank : सांगली बँकेच्या कारभाराची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत बॅंकेच्या चौकशीची मागणी केली आहे. मुख्य सचिवांना चौकशी करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्यात. त्यामुळे लवकरच बँकेवर प्रशासक नेमले जातील असा विश्वास आमदार पडळकरांनी व्यक्त केला.
chabuk morcha on sangli dcc bank this 25 june declares gopichand padalkar and sadabhau khot
chabuk morcha on sangli dcc bank this 25 june declares gopichand padalkar and sadabhau khotSaam Digital

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा या मागणीसाठी येत्या 25 जूनला जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. तसेच बँकेतील घोटाळे बहादरांचा म्हाेरक्या जयंत पाटील हे असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केला.

या बॅंकेतील आजी- माजी संचालकांकडून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. बेकायदेशीर रित्या कर्जांचे वाटप देखील करण्यात आले आहे. अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या माध्यमातून बोगस कर्ज देखील घेण्यात आल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

chabuk morcha on sangli dcc bank this 25 june declares gopichand padalkar and sadabhau khot
Satara: बिचुकले, देऊर ग्रामस्थ मागण्यांवर ठाम, रेल्वे मार्गावर छेडलं आंदोलन

सदाभाऊ खाेत म्हणाले सांगली जिल्हा बँकेची परिस्थिती ही चोर चोर मोसरे भाई अशा पद्धतीची झाली आहे. या बँकेमध्ये दलाल आणि ठेकेदार घुसलेले आहेत. आमदार-खासदार मंत्री झाल्यावर संचालक पद कशासाठी हवे असा संतप्त सवाल करत जिल्हा बँक ही टग्याची बँक झाली आहे अशी टीका करत बॅंकेच्या कारभाराचा सदाभाऊंनी निषेध केला.

Edited By : Siddharth Latkar

chabuk morcha on sangli dcc bank this 25 june declares gopichand padalkar and sadabhau khot
Konkan Politics: राणे-सामंतांच्या बॅनर वाॅरवरुन विनायक राऊतांचा चिमटा (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com