Sanjay Raut Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'गुंडगिरी, झुंडगिरी, माफियामध्ये महाराष्ट्र पुढे..' संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

Maharashtra Crime: राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार, हत्यांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. १० फेब्रुवारी २०२४

Sanjay Raut Press Conference:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार, हत्यांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच पुण्यातही ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले संजय राऊत?

"महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. शिवसेनेचा नगरसेवक आणि एक प्रमुख पदाधिकारी याची हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिल्लू आहे का? अशा शब्दात संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या प्रतिक्रियेवरुन संताप व्यक्त केला. बिहार हा खूप बरा आहे, महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला आहे. गुंडगिरी, झुंडगिरी, माफियामध्ये महाराष्ट्र पुढे गेला..." असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

"ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे या राज्यात निर्भयपणे या माध्यमातून एक ठिकाणी सभा घेत आहेत, त्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या तीन लोकांवर निर्घृण हल्ला झाला, ठार मारण्याचे प्रयत्न करण्यात आला याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच," अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फोटो पोस्ट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा...

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एका गुंडासोबतचा फोटो ट्वीट करतही जोरदार टीका केली आहे. "गृहमंत्री देवेंद्र जी, यालाच म्हणतात गुंडांनी गुंडा साठी चालविलेले राज्य! नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत, हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच," असे संजय राऊत म्हणालेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT