इराणकडून अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी, तेल व्यापार चीनचे चलन युआनमध्ये करणार?

Iran Challenges US Dollar: इराण-इस्रायल युद्ध दिवसेंदिवस पेटत चाललेलं असताना आता इराण महासत्ता अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी करणार आहे... होर्मुझ सामुद्रधुनीच्या माध्यमातून इराण अमेरिकेच्या डॉलरला आव्हान देणार आहे.
Oil tankers passing through the Strait of Hormuz as Iran signals a shift toward yuan-based oil trade challenging the global petro-dollar system.
Oil tankers passing through the Strait of Hormuz as Iran signals a shift toward yuan-based oil trade challenging the global petro-dollar system.Saam Tv
Published On

इस्त्रायल-अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणनं थेट डॉलरला आव्हान दिलंय. इराण अमेरिकेच्या जागतिक महासत्ता प्रतिष्ठेला धक्का देण्याच्या प्रयत्नात आहे. खरंतर, इराण हा केवळ भूराजकीय प्रतिस्पर्धीच नाही तर एक प्रमुख तेल निर्यातदार देश आहे. जगात तेलाचा व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये केला जातो. अशातच आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलाचा व्यापार डॉलरमध्ये नाही, तर चिनी चलन 'युआन'मध्ये होईल, असा पवित्रा इराणने घेतलाय. यामुळे अमेरिकेची आर्थिक जीवनरेखा असणाऱ्या पेट्रोडॉलर प्रणालीसमोर कसं आव्हान निर्माण झालंय पाहूयात...

इराणच्या या निर्णयामुळे चीनचे 'युआन'ला जागतिक चलन बनवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. रशियाने आधीच रुबल आणि युआनमध्ये व्यापार सुरू केला आहे. आता इराणनेही तीच वाट धरल्याने अमेरिकेच्या 'पेट्रोडॉलर' व्यवस्थेला सुरुंग लागला आहे. जर सौदी अरेबियानेही चीनच्या दबावाखाली युआनचा स्वीकार केला, तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.

इस्त्रायल -अमेरिकाविरोधातील युद्धामुळे इराण उद्ध्वस्त झाला असेल, पण अद्याप पराभूत झालेला नाही. अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतरही इराणनं लगेचच नवं नेतृत्व उभं करत अमेरिकेच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केलीय. इराण वगळता जागतिक तेल व्यापारातील सद्यस्थिती काय आहे पाहूयात. जगातील बहुतेक तेलाचा व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होतो. अमेरिकेनं रशियावर लादलेल्या निर्बंधांनंतर रशियन तेल रूबल किंवा युआनमध्ये विकले जातेय. तर रशिया भारतासोबत रूबल आणि रुपयांमध्येही तेल व्यापार करतो. मात्र, चीन आंतरराष्ट्रीय तेल व्यापारात युआनचा वापर वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

महत्त्वाचे म्हणजे, आता इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल टँकर्सवर युआनमध्ये व्यवहार करण्याची अट टाकली तर जागतिक बाजारपेठा देखील हादरू शकतात. इतकंच नाही तर होर्मुझमधील आर्थिक चौकीमुळे जागतिक तेल व्यापारात कायमचा बदल घडण्याची शक्यताये. इराणच्या या 'युआन कार्ड'मुळे अमेरिकेच्या पेट्रोडॉलरचं संपूर्ण गणित बिघडणार का? याकडे आता जगाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com