Delhi Crime News: दिल्ली हादरली! सलूनमध्ये गोळीबार, दोन युवकांचा मृत्यू

Delhi Crime News in Marathi : दिल्लीमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या नजफगडमध्ये सलूनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.
Delhi Crime News
Delhi Crime NewsSaam tv
Published On

Delhi Crime News :

दिल्लीमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या नजफगडमध्ये सलूनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्लीतील नजफगढ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली आहे. सलूनमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. दिल्लीतील इंद्रा पार्कमधील सलूनमध्ये ही घटना घडली आहे. या गोळीबारात दोन तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोनू आणि आशिष नावाच्या तरुणावर गोळीबार झाला. या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसेच या घटनेबद्दल या दोन्ही युवकांच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

दिल्लीच्या नजफगड येथील ही घटना आहे. शुक्रवारी सलूनमध्ये घुसून काही अज्ञातांनी तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. या गोळाबारात दोन युवकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी जखमी युवकांना रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी या दोन जखमी युवकांना मृत घोषित केले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या घटनेत आरोपी गोळीबार करताना दिसत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही मृत युवकांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मृतकांच्या कुटुंबातील सदस्यांनी याबाबत माहिती कळविली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरु केला आहे. या घटनेने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com