Former Rahuri MLA Prajakt Tanpure’s remarks praising Chief Minister Devendra Fadnavis have intensified political speculation ahead of the Rahuri Assembly by-election.
Former Rahuri MLA Prajakt Tanpure’s remarks praising Chief Minister Devendra Fadnavis have intensified political speculation ahead of the Rahuri Assembly by-election.Saam Tv

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

Maharashtra By-Election:राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून आता चांगलचं राजकारण तापलंय... राहुरीची पोटनिवडणुक बिनविरोध होणार का? माजी आमदार प्राजक्त तनपुरे राहुरीची निवडणुक लढवणार का? राहुरीच्या उमेदवारीवरून सस्पेन्स का आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Published on

हे आहेत... शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे.... एकीकडे राहुरी विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर झालेली असताना तनपुरेंनी केलेल्या या विधानामुळे चांगलीच चर्चा रंगलीय...भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली... या जागेवर लढण्यासाठी शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिलेही आग्रही आहे... त्यांनी मुंबईत वरिष्ठांशी उमेदवारीवरून चर्चाही केलीय... मात्र त्याचवेळी तनपुरेंनी मुख्यमंत्र्याच्या कामाचं कौतुक केल्यानं आणि मतदारसंघात हिंदुत्ववादीची पताका हाती घेतल्यानं राहुरीतील भाजपचा उमेदवार कोण असणार? प्रश्न उपस्थित झालाय...आता तनपुरेंचं हे विधान ऐका...

2019 ला याचं प्राजक्त तनपुरेंनी शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला होता... त्यानंतर 2024 ला आमदार शिवाजी कर्डिलेंनी तनपुरेंना विधानसभेत धूर चारली... मात्र आता पोटनिवडणुकीत तनपुरे कुठल्या पक्षाकडून लढणार? हे कार्यकर्त्यांना ठामपणे सांगत नाहीय़... ज्यामुळे राहुरीतील उमेदवारीवरून प्रश्न उपस्थित होतायत...दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुरी विधानसभेच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम ठेवत... बिनविरोध निवडणुक व्हावी, अन्यथा आम्ही लढायला तयार आहोत... असं ठणकावून सांगितलयं...

दुसरीकडे पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो, त्यामुळे जनतेचे समर्थन असेल त्यालाच मुख्यमंत्री उमेदवारी देतील, असं विधान भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केलयं....

एकीकडे माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत दिलेलं असताना कोणत्या पक्षातून निवडणुक लढवणार हे गुलदस्त्यात ठेवलयं... तर दुसरीकडे भाजपनं अक्षय़ कर्डिलेंच्या उमेदवारीबाबत कुठलीच भूमिका घेतली नाहीय... ज्यामुळे राहुरीचा उमेदवार नेमका कोण असणार असा प्रश्न उपस्थित होतोय...मात्र तनपूरे यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचे केलेले कौतुक बघता, आगामी काळात राहुरीतील राजकीय समिकरण बदलणार का? याकडे मतदारसंघाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com