Beed Crime: संतापजनक! बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अत्याचार करुन चावडीवर बांधलं

Beed Hivarapahadi Village Woman Assault Case: बीडमध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय... एका विवाहितेचं घरातून अपहरण करत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपी एव्हढंच करुन थांबला नाही तर त्यानं तिला चावडीवर बांधून ठेवलं. बीडमध्ये गुन्हेगारी कशी फोफावलीय.
Villagers gather near the village chavdi in Beed district after a shocking assault case involving a young woman surfaced
Villagers gather near the village chavdi in Beed district after a shocking assault case involving a young woman surfacedSaam Tv
Published On

माणुसकीला काळीमा फासणारी ही दृश्य आहेत... बीडमधल्या हिवरापहाडी गावातली....ज्या गावच्या चावडीवर न्याय मिळायला हवा... त्याच चावडीवर एका विवाहितेला नराधमानं शारिरिक अत्याचार करुन बांधून ठेवलं... 10 मार्चची रात्र... पीडित विवाहिता आपल्या पतीसोबत रात्री घरात झोपली होती...त्याचवेळी आरोपी घरात शिरला... त्यानं विवाहितेला उचलून गावाबाहेरच्या नदीजवळ नेलं... आणि अब्रूची लक्तरं तोडली...अत्याचार करूनही त्या नराधमाचं मन भरलं नाही. त्याने विवाहितेला गावात आणलं आणि गावातील चावडीवरच्या खांबाला तिचे हात-पाय बांधून ठेवले... रात्रभर बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या विवाहितेकडे साधं कुणाचंच लक्ष गेलं नाही.

सकाळी गाव जागं झालं आणि हा संतापजनक प्रकार लक्षात आला... गावकऱ्यांनी चावडीभोवती एकच घेराव घातला... मात्र पीडितेला सोडवण्याऐवजी विचारपुस करण्यातच अनेकांनी धन्यता मांडली...अखेर नातेवाईकांनी पीडितेची सुटका केली... आरोपीच्या दहशतीमुळे पीडितेच्या कुटुंबाने दोन दिवस ही घटना लपवून ठेवली. पण अखेर आईच्या काळजाचा बांध फुटला आणि मामासोबत तिने पिंपळनेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली....

दुसरीकडे तपासादरम्यान पोलीसांना पीडिता अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती मिळालीय.. अवघ्या 17 वर्षांच्या या पीडितेचं 4 वर्षांआधी लग्न झालं असल्यानं बालविवाह प्रतिबंधक कायद्याचंही उल्लघंन झाल्याचं समोर आलयं.. त्यामुळे आरोपी आणि पीडितेची चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध सुरु आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं राज्य हादरुन गेलं होतं. आता हिवरापहाडीतील घटनेनं समाजमन सुन्न झालंय. बीडमधील गुन्हेगारी कधी थांबणार? आणि ताज्या घटनेतील पीडितेला न्याय कधी मिळणार? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com