Pakistan Election Result: पाकिस्तानमध्ये पुन्हा शरीफ सरकार? आमच्याकडे बहुमत, सत्ता स्थापन करणार; माजी पंतप्रधानांचा दावा

Pakistan Election Result 2024: पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालासाठी गेल्या २४ तासांपासून मतमोजणी सुरू आहे.
Pakistan Muslim League (N) leader Nawaz Sharif
Pakistan Muslim League (N) leader Nawaz Sharif Saam Tv
Published On

Pakistan Election Result 2024:

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालासाठी गेल्या २४ तासांपासून मतमोजणी सुरू आहे. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळताना दिसत आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही.

दरम्यान, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दावा केला आहे की, पीएमएल-एन सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. अशातच ते इतर पक्षांसोबत आघाडीचे सरकार स्थापन करणार आहेत. नवाज शरीफ शुक्रवारी रात्री लाहोरमधील पीएमएल-एन सचिवालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी पक्ष समर्थकांना संबोधित केले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pakistan Muslim League (N) leader Nawaz Sharif
Chhagan bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलीस सुरक्षा वाढविण्याची कार्यकर्त्यांची मागणी

पीएमएल-एनचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, या निवडणुकांमध्ये पीएमएल-एन देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्यामुळे आज आपण सर्वजण आनंद साजरा करत आहोत. पाकिस्तानी मीडिया आउटलेट द डॉनच्या वृत्तानुसार, नवाझ शरीफ म्हणाले, "पीएमएल-एन युती सरकार स्थापन करण्यासाठी पीपीपी, एमक्यूएम-पी, जेयूआय-एफ यांच्याशी संपर्क साधत आहे." (Latest Marathi News)

त्यांनी आपला धाकटा भाऊ शेहबाज यांना पीपीपीचे आसिफ अली झरदारी, जेयूआय-एफचे फजलुर रहमान आणि एमक्यूएम-पीचे खालिद मकबूल सिद्दीकी यांच्याशी आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी संपर्क साधण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, आज शाहबाज शरीफ आणि इशाक दार यांची बैठक होणार आहे.

Pakistan Muslim League (N) leader Nawaz Sharif
Parliament session 2024: उद्या संसदेत नेमकं काय घडणार? भाजपने जारी केला व्हीप, सर्व खासदारांना हजर राहावं लागणार

आपल्या भाषणात नवाझ शरीफ पुढे म्हणाले की, "सध्याची परिस्थिती पाहता, पाकिस्तानला किमान 10 वर्षे स्थिरतेची गरज आहे. शरीफ म्हणाले की, पाकिस्तानला सध्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून सरकार स्थापन करण्याची गरज आहे. ते म्हणाले, “आम्ही पुन्हा पुन्हा निवडणुका घेऊ शकत नाही. काल आम्ही सगळे एकत्र बसलो, पण काहीही परिणाम न झाल्याने तुम्हाला संबोधित केले नाही.” नवाज म्हणाले, “या देशाच्या सर्व संस्थांनी, सर्वांनी मिळून पाकिस्तानला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावली पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com