सुनील काळे, मुंबई
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्यात येणार असल्याची माहिती भुजबळांना कळविण्यात आली आहे. भुजबळ यांना धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. (Latest Marathi News)
मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मागच्या वेळी एका व्यक्तीने फोनवर सलग १२ मेसेज पाठवत भुजबळांना धमकी दिली होती. त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी मनोज घोडके यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा भुजबळांना धमकी मिळाली असून कार्यकर्त्यांनी सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
छगन भुजबळ यांना नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याचा मजकूर पत्रात आहे. अज्ञात व्यक्तींकडून आपल्याला ठार मारले जाईल, अशी माहिती एका पत्राद्वारे भुजबळांना पाठविण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंत्री छगन भुजबळ यांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
मागच्या वेळी छत्रपती संभाजीनगर शहरातील एका तरुणाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्या निवास्थानाबाहेरील बंदोबस्त वाढवला होता. त्यानंतर भुजबळ यांच्या ताफ्यातील सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा धमकी आल्याने त्यांची सुरक्षा पुन्हा वाढविण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
'साहेब तुम्हाला उडविण्याची सुपारी ५ जणांनी घेतली आहे. तुम्हाला उडविण्यासाठी ५० लाखांची सुपारी घेण्यात आली आहे. या गुंडापासून सावध राहा. हे ५ जण तुम्हाला रात्रभर शोधत फिरत आहे. तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा, असा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राज्यभरात दौरा करत आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरून छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.