Abhishek Ghosalkar Case Update: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट, मॉरिस नोरोन्हाच्या बॉडीगार्डला अटक

Abhishek Ghosalkar Case News: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मॉरिस नोरोन्हाच्या अंगरक्षकाला अटक केली आहे
Abhishek Ghosalkar Case: Mumbai Crime Branch Police Arrested Mauris Noronha Bodyguard
Abhishek Ghosalkar Case: Mumbai Crime Branch Police Arrested Mauris Noronha BodyguardSaam Tv
Published On

Abhishek Ghosalkar Case:

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मॉरिस नोरोन्हाच्या अंगरक्षकाला अटक केली आहे. अंगरक्षकाला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Abhishek Ghosalkar Case: Mumbai Crime Branch Police Arrested Mauris Noronha Bodyguard
Abhishek Ghosalkar News: ...तर घोसाळकरांचा जीव वाचला असता; गोळीबार प्रकरणी महत्वाची माहिती उघडकीस

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. मॉरिसने ५ गोळ्या झाडून अभिषेक घोसाळकरांची हत्या केली. घोसाळकरांची हत्या केल्यानंतर मॉरिसने स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. (Mumbai Latest News)

अभिषेक घोसळकर यांच्यावर ज्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला. ती बंदूक मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राची होती. त्याने ही बंदूक उत्तर प्रदेशातील फुलपूर येथील कारखान्यात बनवली होती. मॉरिसने बंदुकीने स्वत:च्या कार्यालयात घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या. या बंदुकीतील पाच गोळ्या अभिषेक यांना लागल्या होत्या.

Abhishek Ghosalkar Case: Mumbai Crime Branch Police Arrested Mauris Noronha Bodyguard
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मॉरिसवर गुन्हा दाखल; 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मॉरिसच्या बॉडीगार्डला अटक

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मेहुल पारेख नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यानंतर मॉरिस नोरोन्हा यांच्या अंगरक्षकाला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या अंगरक्षकाला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमरेंद्र मिश्रा असे या बॉडीगार्डचे नाव आहे. तो काही महिन्यांपूर्वी मॉरिससोबत होता. उद्या शनिवारी गुन्हे शाखा अमरेंद्रला मुंबईच्या किल्ला कोर्टात हजर करणार आहे.

अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाला धाकट्या भावाने अग्नी दिला. दहिसरमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घोसाळकर यांचं पार्थिव दर्शनासाठी आणलं, त्यावेळी वडील विनोद घोसाळकर, पत्नी,मुलगी यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी टाहो फोडला होता. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com