Yavatmal Crime News: दगडाने ठेचून युवकाची हत्या; यवतमाळमधील खळबळजनक घटना

Youth Killed In Gurunanak Nagar: यवतमाळच्या गुरुनानकनगरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका युवकाचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे.
Yavatmal Crime
Yavatmal Crime Saam Tv

Yavatmal Crime Youth Killed

यवतमाळच्या गुरुनानकनगरमध्ये (Gurunanak Nagar) एका युवकाचा दगडाने ठेचून हत्या (Youth Killed) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नक्की ही घटना का घडली, कधी घडली हे आपण जाणून घेऊ या. (Latest Crime News)

दगडाने ठेचून एका तरुणाची निर्घुन हत्या करण्यात आली आहे. ही घटना यवतमाळ शहरातील आदिवासी सोसायटीमध्ये रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. सचिन मोटे ( वय 35, राहणार आदिवासी सोसायटी, यवतमाळ) असं मृत तरुणाचं नाव आहे. यवतमाळ (Yavatmal News) अवधूतवाडी पोलीस या संदर्भात अधिक तपास करीत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपीचा शोध सुरू

जुन्या वादातून अज्ञातांनी केली हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते माहिती मिळाल्यानंतर दाखल झाले होते. ही घटना यवतमाळच्या गुरुनानकनगरमध्ये घडली (Yavatmal Crime News) आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

यवतमाळमध्ये (Yavatmal) दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं दिसतंय. दरम्यान आता या तरूणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आलीय. परिसरात मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. घटनेमुळे परिसरात भितीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा (Yavatmal Crime Youth Killed) वेगाने तपास करत आहे.

Yavatmal Crime
Crime News: आधी बहिणीला दारू पाजली, नंतर प्रियकराला रुममध्ये बोलावलं; तरुणीच्या कृत्याने पोलिसही चक्रावले

कोल्हापूरमधील घटना

कोल्हापूरमध्ये धारधार हत्यारांनी वार करून तरुणाचा खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे ही घटना उघडकीस आली होती. मृत व्यक्तीचं नाव संतोष कदम होतं. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचं आलं समोर आलं होतं. कुरुंदवाड पोलीस घटनास्थळी तपास करत (Crime News) होते.

मृतदेह, चारचाकी गाडी ठेवून मारेकरी पसार झाले होते. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक तपास करत होते. आरोपींचा शोध घेणं सुरू होतं. परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेतला जात होता.

Yavatmal Crime
Nagpur Crime: आधी हेरायचा मग डाव साधायचा... पठ्ठ्याने ९ जिल्ह्यातून तब्बल १११ दुचाकी चोरल्या; कारनामा ऐकून पोलिसही चक्रावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com