जादूटोणा करत भस्मातून पाऊस पाडून रक्कम दुप्पट करून देण्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. अशीच एक घटना वाशिम (Washim) जिल्ह्यात घडली आहे. पैशांच्या पावसाच्या आमिषाला एक उच्च शिक्षित व्यक्ती बळी पडला आहे. नक्की काय घडलंय, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)
वाशिममधील एका उच्चशिक्षीत व्यक्तीची तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक (Money Shower Fraud) झाल्याची घटना वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे उघड झाली. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये सात ते आठ आरोपी फरार आहेत. त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'अशी' घडली घटना
सातारा जिल्ह्यातील सचिन श्रीरंग देशमुख, अशी फसवणूक झालेल्या व्यक्तीची ओळख आहे. त्याने बी.एस.सी.ॲग्रीचं शिक्षण घेतलेलं आहे. आरोपी युसूफ खान जिल्हा बुलढाणा व इतर ७ ते ८ आरोपीनी संगनमत करून १५ दिवसापूर्वी सचिनची भेट घेतली. त्यांनी जादूटोना करत भस्माच्या डब्ब्यातून पैशाचा पाऊस पाडल्याचे (Washim Crime Money Shower) भासवले. सचिनचा विश्वास संपादन केला. ही घटना मेहकर रिसोड मार्गावरील एका खेड्याच्या शिवारात एका शेडमध्ये घडली होती. आरोपी महाराजांच्या वेश्यात होते.
त्यानंतर ६ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेदरम्यान अकोला जिल्ह्यातील पातूर येथील बसस्थानक जवळ भस्माची डब्बी घेण्यासाठी सचिनला त्यांनी प्रवृत्त केलं. सचिनकडून ८ लाख रुपये घेतले. त्यानंतर मेडशी ते डोंगरकिन्ही मार्गावर एका गाडीतून पोलिसांच्या वेशात आरोपी आले. त्यांनी सचिनच्या गाडीतील तायडे महाराज व शेख चांद यांना मारहाण करण्याचा बनाव (Washim Crime) केला. त्यांना सोबत घेऊन गेले.
आरोपी पसार होण्याच्या तयारीत
मात्र, यात आपली फसवणूक झाल्याचं सचिनच्या लक्षात आलं. त्याने त्यांचा पाठलाग करून मेडशी येथे आरोपीची गाडी एका गल्लीत अडवली. दरम्यान आरोपी पळून जात असताना सचिनने आरडाओरड केली. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने एका आरोपीला खाजगी ट्रॅव्हल्समध्ये बसताना पकडले. मात्र, यावेळी काही आरोपी पसार ( Crime news) झाले.
पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा
या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात (Malegaon Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आलीय, तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आलं आहे, अशी माहिती वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.