Fraud Case
Fraud CaseSaam tv

Fraud Case : सिमेंटमध्ये भेसळ व कमी वजन; शेतकऱ्याच्या तक्रारीवरून वितरकावर फसवणुकीचा गुन्हा

Buldhana News : घरकुलाच्या बांधकामासाठी राजेंद्र बैस यांनी खामगाव येथील शेख सलीम या सिमेंट वितरकाला शंभर सिमेंटच्या थैलांची ऑर्डर दिली. मात्र ज्यावेळी बांधकाम करण्यात आले
Published on

संजय जाधव 

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एका सिमेंट कंपनीच्या वितरकाकडून सिमेंट पुरवठ्यात (Buldhana) भेसळ केली जात असून सिमेंटच्या एका गोणीत ४ किलो कमी सिमेंट भरले जात असल्याचे सामोर आले आहे. याबाबत (Farmer) शेतकऱ्यांचा तक्रारीवरून सिमेंट वितरकावर गुन्हा दाखल करण्यात आला अणे. (Breaking Marathi News)

Fraud Case
Amalner News : उभ्या कारला अचानक लागली आग; कारमध्ये झोपलेले दोघे जखमी

बुलढाण्यात जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील राजेंद्र बैस या शेतकऱ्याला शासकीय योजनेतून घरकुल मिळाले. या घरकुलाच्या बांधकामासाठी राजेंद्र बैस यांनी खामगाव येथील शेख सलीम या सिमेंट वितरकाला शंभर सिमेंटच्या थैलांची ऑर्डर दिली. मात्र ज्यावेळी बांधकाम करण्यात आले. त्यावेळेस सिमेंट सुकत नसल्याने राजेंद्र बैस याना शंका आली. त्यानुसार प्रत्येक थैलीचे वजन केलं असता त्यांना सिमेंटमध्येही कमी वजनाच्या थैल्या आढळल्या. तसेच सिमेंटमध्येही भेसळ आढळली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Fraud Case
Bus Accident: धावत्या बसचे टायर फुटल्याने कठडा तोडून गेली खाली; पाच महिला जखमी

पोलिसांकडून चौकशी सुरु 

खामगाव परिसरात बोगस सिमेंट तयार करून विकणाऱ्या टोळीचा शोध लागला असून यात अल्ट्राटेक कंपनीच्या काही कामगारांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार राजेंद्र बैस यांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली. बैस यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खामगाव येथील शेख सलीम या सिमेंट वितरका विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित वितरकाने या सिमेंटमध्ये भेसळ कशी व कुठे केली? रिपॅकेजिंग कसं केलं? याची चौकशी आता पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com