Bus Accident: धावत्या बसचे टायर फुटल्याने कठडा तोडून गेली खाली; पाच महिला जखमी

Dhule News : दोंडाईचा बसस्थानकातून ३५ प्रवासी घेऊन वाडीमार्गे लामकानी येथे मुक्काम जात होती. या बसवर संजय बुधा कोळी हे चालक होते. बस सायंकाळी सहाला बसस्थानकातून निघाली होती.
Bus Accident
Bus AccidentSaam tv
Published On

दोंडाईचा (धुळे) : दोंडाईचा आगारातील लामकानी मुक्कामाला जाणाऱ्या धावत्या बसचे टायर फुटल्याने अपघात झाला. यामुळे बस (St Bus) रस्त्याच्या कडेला असलेला कठडा तोडून खाली उतरली. या अपघातात पाच महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. चालकाने वेळीच नियंत्रण मिळविल्याने (Dondaicha) मोठा अनर्थ टळला आहे. जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. (Maharashtra News)

Bus Accident
Manmad News : अवैध दारू निर्मिती अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त

दोंडाईचा बसस्थानकातून ३५ प्रवासी घेऊन वाडीमार्गे लामकानी येथे मुक्काम जात होती. या बसवर संजय बुधा कोळी हे चालक होते. बस (Bus Accident) सायंकाळी सहाला बसस्थानकातून निघाली होती. शहरातील मांडळ चौफुलीपासून एक किलोमीटर अंतरावर पोहचली असता (Accident) अचानक डाव्या बाजूकडील पुढचे टायर फुटल्याने बस रस्त्यावरून खाली उतरली. पाच फूट अंतरावरच विजेचा खांब होता. सुदैवाने बस थांबल्याने मोठी दुर्घटना टळली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bus Accident
Amalner News : उभ्या कारला अचानक लागली आग; कारमध्ये झोपलेले दोघे जखमी

५ महिला प्रवाशी जखमी 

या बस अपघातात जनाबाई गोविंद पाटील (रा. मांडळ), आशाबाई विजय गोडसे (अंजनविहीरे), वत्सलाबाई हिलाल पाटील (मांडळ), ललिताबाई संतोष चव्हाण (अंजनविहरे), अरुणाबाई सुरेश पाटील (मांडळ) या पाच महिला किरकोळ जखमी झाल्या. डॉ. पारूल अग्रवाल यांनी उपचार केले. बस चालकही किरकोळ जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा आगारातील वाहतूक निरीक्षक जगदीश पाटील, वाहतूक नियंत्रण वसंत कोळी, नरेंद्र भाबड, व्ही. डी. जाधव, पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com