haircut price rise Saam tv
महाराष्ट्र

Salon Price Hike : सर्वसामान्यांना मोठा झटका! केस कापणे, दाढी करणे आणि मसाजच्या दरात वाढ होणार, नवे दर काय?

Parlour price increase : नवीन वर्षात सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे. सलून आणि पार्लर सेवेत मोठी दरवाढ होणार आहे. या सेवेत २० टक्क्यांनी दरवाढ होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसणार आहे.

Vishal Gangurde

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्धा : नवीन वर्षांच्या पहिल्या महिन्यात सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे. या जानेवारी महिन्यात सलून आणि पार्लरच्या दरात वाढ होणार आहे. सलून व्यावसायिक दरात एकूण २० टक्के वाढ करणार असल्याची माहिती हाती आली आहे. सलून ब्युटी पार्लर असोशिएशन नाभिक संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. नाभिक संघटनेच्या या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात सलून ब्युटी पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. या संघटनेच्या सलून व्यावसायिकांनी २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारीपासून ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महागाईसोबतच सलून ब्युटी पार्लरमध्ये लागणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाल्यानं दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

संघटनेच्या निर्णयानंतर आता साधी कटिंग १०० रुपये तर साधी दाढीकरिता ७० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच इतर बाबीतही दरवाढ करण्यात आली आहे. सलून ब्युटी पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेचे जवळपास ६०० सदस्य आहेत. संघटनेच्या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. सलूनच्या दरवाढीची माहिती सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने पत्रकार परिषदेत दिली.

सलून ब्युटी पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश अतकरे म्हणाले की, '२६ जानेवारीपासून सलूनच्या दरात वाढ होणार आहे. सर्व ठिकाणी महागाई वाढली आहे. या महागाईनुसार सलूनचे दर वाढणार आहे'.

'वीज, घरभाडे, करभाडे, सलून साहित्यावरील दरवाढ झाली आहे. या महागाईचा बोजा हा सलून व्यवसायावर पडत आहे. त्यामुळे आम्ही दरवाढ करत आहोत. आमच्या कुटुंबाचा पालनपोषणाचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे दरवाढ करत आहोत. ही दरवाढ २६ जानेवारीपासून होणार आहे. महागाईनुसारच दरवाढ करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

असे असणार नवे दर?

साधी कटिंग - 100

प्रोफेशनल कटिंग - 120

साधी दाढी - 70

डेनिम दाढी - 80

वेगवेगळ्या प्रकारचे मसाज - 80 रुपयापासून 350 रुपयांपर्यंत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT