Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Inflation: अर्थमंत्र्यांच्या उत्तरानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागलाय. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी सरकार लवकरच नवीन पावले उचलेल, अशी आशा काही लोकांनी व्यक्त केली.
Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या  विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत
Nirmala SitharamanSaam TV
Published On

देशातील वाढत्या महागाईचा परिणाम जनसामान्य लोकांच्या जीवनावर पडत आहे. महागाईमुळे मध्यमवर्गातील लोक अडचणीत सापडलेत. सरकार या महागाईच्या संकटातून बाहेर काढेल अशी आशा ते सरकारकडून करत आहेत. महागाईच्या या युगात सर्वसामान्य जनतेला सरकारकडून दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. दरम्यान महागाईच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर एका युजरने केलेल्या पोस्टवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिलीय.

अर्थमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागलाय.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर, तुषार नावाच्या युझरने अर्थमंत्र्यांना टॅग करत महागाईसंदर्भात एक पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. वाढत्या महागाईमुळे मध्यमवर्गातील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या  विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत
KVP Yojana: खुशखबर! या योजनेत गुंतवलेले पैसे होणार डबल, गुंतवणूदारांना फायदाच फायदा; योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

मी अर्थमंत्र्यांना नम्रपणे विनंती करतो की, या मध्यमवर्गातील लोकांसाठी सरकारने काही तरी करावे. जनतेला दिलासा द्यावा. परंतु हे काम सरकारसाठी आव्हानात्मक आहे. परंतु यावर विचार करावा, असं या युझरने म्हटलंय.

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या  विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत
RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! या बँकेचा परवाना केला रद्द, कारण काय?

या पोस्टला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, तुमच्या समजुती आणि कौतुकाबद्दल मी तुमची आभारी आहे. मला तुमची महागाईबद्दलची चिंता समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे एक जबाबदार सरकार आहे, जे लोकांचं ऐकतं आणि त्यांच्याकडे लक्ष देते. तुमचे इनपुट आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

अर्थमंत्र्यांचे हे उत्तर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. आतापर्यंत 1.4 हजारांहून अधिक युझर लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे आणि 300 हून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. अनेक वापरकर्त्यांनी अर्थमंत्र्यांच्या या पावलाचे कौतुक केले आहे. मध्यमवर्गीयांच्या समस्या समजून घेण्यासाठी सरकारने या दिशेने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षादेखील अनेकांनी व्यक्त केलीय

अर्थमंत्र्यांच्या उत्तरानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचास पाऊस पडू लागलाय. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी सरकार लवकरच नवीन पावले उचलेल, अशी आशा काही लोकांनी व्यक्त केली. तर काहींनी केवळ प्रतिक्रिया दिल्याने परिस्थिती सुधारेल का? का त्यासाठी ठोस धोरणे राबवली जातील, असा प्रश्न केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com