ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांचे गळणे हे साहजिक असून विविध कारणांमुळे केस गळतात.
काही लोक केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करतात. प्रमाणापेक्षा जास्त हीटमुळे केस गळतात.
हेअर ड्रायरच्या अतिवापरामुळे केसांशी संबधित अनेक समस्या होऊ शकते. यामुळे केस कमजोर देखील होऊ शकतात.
हेअर ड्रायरच्या गरम हवेमुळे केसातील मॅाइश्चर निघून जाते. यामुळे केस ड्राय होतात.
हेअर ड्रायरच्या गरम हवेमुळे स्कॅल्पला खाज सुटते. आणि सूज येते. यामुळे स्कॅल्पची त्वचा खराब होते.
सतत हेअर ड्रायरचा वापर केल्याने केसातील सीबम म्हणजेच नैसर्गिक तेलाची कमतरता होऊ शकते. ज्यामुळे केस ड्राय होतात आणि गळतात.
हेअर ड्रायरच्या अतिवापराने केस गळतात. म्हणून शक्यतो याचा अतिवापर टाळा.
हेअर ड्रायर वापरण्याअगोदर केसांना हीट प्रोटेक्टंट लावा. तसेच हेअर ड्रायरला लो हीट सेटींग वर वापरा. जेणेकरुन केसांवर जास्त परिणाम होणार नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: पिगमेंटेशन आणि डार्क स्पॅाट्समुळे हैराण? चमचाभर कोरफडीचा करा 'असा' वापर; चेहरा चमकेल