ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोरफड त्वचेच्या अनेक समस्यांसाठी उपयोगी आहे. या व्यतिरिक्त त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी आणि चमकदार त्वचेसाठी कोरफडचा वापर केला जाऊ शकतो.
वाढत्या वयासोबत त्वचेतील मेलानिनचे प्रमाण वाढते. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि काळे डाग वाढतात.
पिगमेंटेशनचे प्रमाण वाढल्याने चेहऱ्यावर काळे डाग वाढतात यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रोडक्टस वापरतात.
कोरफडमध्ये एलोइन असते जे चेहऱ्यारील डाग कमी करण्यास मदत करतात. पिगमेंटेशन घालवण्यासाठी तुम्ही कोरफडचा वापर करु शकता.
मध आणि कोरफड एकत्र मिक्स करुन लावल्या चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
लिंबू, गुलाबजल आणि कोरफड एकत्र मिक्स करुन लावल्यास पिंपल्स आणि काळे डाग कमी होतात.
कोरफड जेलमध्ये व्हिटॅमिन ई मिक्स करुन लावल्याने चेहरा चमकदार होतो.
आठवड्यातून तीन वेळा नारळाचे तेल आणि कोरफड एकत्र मिक्स करुन लावा. यामुळे डाग कमी होण्यास मदत होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: हिवाळ्यात बनवा टेस्टी आणि हेल्दी मटार पराठा, नोट करा रेसीपी