ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मटारमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात जे पचनक्रियेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच मटार हार्टसाठी देखील फायदेशीर असतात.
मटार पराठा हा टेस्टी आणि तितकाच हेल्दी देखील आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरात मटारचा पराठा बनवू शकता.
सर्वप्रथम गहूच्या पीठात थोडे मीठ आणि तेल ॲड करा आणि पाणी मिक्स करुन पीठ मळून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करा. त्यात जीरा आणि हिंग ॲड करा त्यानंतर आले, हिरवी मिरची आणि कांदा ॲड करुन भाजा.
यामध्ये मॅश केलेले मटार आणि धने- जीरे पूड, लाल मसाला, गरम मसाला मीठ, हळद ॲड करा. तसेच कोथिंबिर ॲड करुन मिक्स करा.
एक पीठाचा गोळा घ्या त्यात तयार केलेले मिश्रण ॲड करुन पराठा लाटून घ्या.
एका तव्यावर तेल लावून पराठा दोन्ही बाजूने नीट शेकून घ्या.
हेल्दी आणि टेस्टी मटार पराठा तुम्ही तुमच्या आवडच्या चटनीसोबत खा.
NEXT: फॅटी लिव्हरचा आजार असल्यास 'या' फळांचे सेवन करु नये