Fatty Liver: फॅटी लिव्हरचा आजार असल्यास 'या' फळांचे सेवन करु नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फॅटी लिव्हर

अनेकांना फॅटी लिव्हरचा आजार आहे. खराब जीवनशैली आणि अनहेल्दी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे यकृतामध्ये फॅट्स म्हणजेच चरबी जमा होते याला फॅटी लिव्हर म्हणतात.

liver | yandex

आजार

सुरुवातीच्या टप्प्यावर आजार असल्याचे कळल्यास त्यावर उपचार करुन त्याला बरे करता येते. अन्यथा हळूहळू हा आजार गंभीर आजारात बदलू शकतो.

liver | yandex

ही फळ खाऊ नये

फॅटी लिव्हर असल्यास काही पदार्थांचे सेवन करणे टाळावे. यामध्ये काही फळांचाही समावेश आहे.

Fruits | yandex

आंबा

आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. याचे सेवन केल्यास शुगर फॅट वाढतो. त्यामुळे आंबा खाणं टाळा.

Mango | yandex

सीताफळ

सीताफळमध्ये देखील साखरेचे प्रमाण अधिक असते याशिवाय हा फळ पचनाला कठीण असतो. म्हणून सीताफळ खाऊ नये.

custard apple | yanfdex

लीची

फॅटी लिव्हर असल्यास लीची खाऊ नका. या फळात नैसर्गिक शुगरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील फॅट्चे प्रमाण वाढते.

Lychee | yandex

फणस

अनेकांना फणस खूप आवडतो. फणसाची भाजी किंवा फळ म्हणून फणस आवडीने खाल्ला जातो. परंतु फणसमुळे लिव्हरचा फॅट वाढतो.

Jackfruit | yandex

ड्राय फ्रुट्स

ड्राय फ्रुट्स शरीरासाठी फायदेशीर असते परंतु ज्यांना फॅटी लिव्हचा त्रास असतो त्यांनी ड्राय फ्रुट्स खाऊ नये. यामुळे लिव्हरला सूज येते.

Dry Fruits | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: संभाजीनगरमधल्या 'या' प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या

Places | google
येथे क्लिक करा